बालाजी क्यादरकुंटेचा राष्ट्रीय एकता शिबिरात सहभाग

0
बालाजी क्यादरकुंटेचा राष्ट्रीय एकता शिबिरात सहभाग

उदगीर (एल पी उगीले ) येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवक बालाजी क्यादरकुंटे याने राष्ट्रीय एकता शिबिर 2026 मध्ये उल्लेखनीय सहभाग नोंदवला. तामिळनाडूतील स्वामी विवेकानंद आर्ट सायन्स वुमन्स कॉलेज, विरचीपल्लायम ता. संकगीरी, जि. सालेम येथे आयोजित राष्ट्रीय एकता शिबिर 2026 मध्ये उत्साहपूर्ण सहभाग नोंदवून महाविद्यालयाचा गौरव वाढविला.
देशातील विविध राज्यांतील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांच्या उपस्थितीत हे शिबिर पार पडले. शिबिरादरम्यान राष्ट्रीय एकात्मता, सांस्कृतिक विविधता, सामाजिक बांधिलकी, पर्यावरण जनजागृती आणि नेतृत्व विकास या विषयांवर विविध उपक्रम, चर्चासत्रे व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बालाजी क्यादरकुंटे यांनी सर्व उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत महाविद्यालयाचे प्रभावी प्रतिनिधित्व केले. या यशाबद्दल महाविद्यालयात सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाधिकारी डॉ. बालाजी होकरणे व डॉ. निळकंठ वगशेट्टे उपस्थित होते. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के व उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मान्यवरांनी बालाजी क्यादरकुंटे यांचे अभिनंदन करून भविष्यातही राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्यासाठी प्रेरणा दिली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!