तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबी च्या जाळ्यात! 50 हजारांच्या लाचेची मागणी, 20 हजारांवर सौदा?

0
तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबी च्या जाळ्यात! 50 हजारांच्या लाचेची मागणी, 20 हजारांवर सौदा?

उदगीर (एल पी उगीले) उदगीरचे तहसीलदार म्हणून व्यंकटेश मुंडे यांनी अत्यंत उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात जनसंपर्क ठेवला होता. सर्वसामान्य माणसाची कामे देखील मोठ्या गतीने त्यांच्या कार्यकाळात होत होती. या ठिकाणचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांची बदली कंधारला झाली, त्यानंतर परळीला बदली झाली.
परळीतील तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांना लाच लुचपत पथकाने ताब्यात घेतले असल्याची बातमी वनव्यासारखी मराठवाडा भर पसरली आहे. या संदर्भात हाती आलेली माहिती अशी की, तक्रारदाराकडून सालंसी प्रमाणपत्र देण्यासाठी 50 हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याची तक्रार तक्रारदाराने बीड लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात नोंदवली.या तक्रारीनंतर लाच लुचपत पथकाने सापळा रचून कारवाई केली. तक्रारदाराकडून सुरुवातीला 50 हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र तडजोडीनंतर 20 हजार रुपयांवर सौदा ठरल्याची माहिती समोर आली आहे.लाच लुचपत तक्रार दाखल झाल्यानंतर पथकाने पडताळणी करून सापळा रचला. प्रत्यक्षात मात्र तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी लाचेची रक्कम स्वीकारलेली नाही, असे असले तरीही लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आपल्याकडे भरपूर पुरावे आहेत असे सांगून त्यांना ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परळी तालुक्यातीलच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यात महसूल प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. बीड जिल्ह्यातही या कारवाईची जोरदार चर्चा सुरू आहे.

हा चक्रव्यूहाचा भाग असेल…..

आज पर्यंत तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी प्रत्येक ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीची सेवा दिली आहे. शिवाय त्यांचा जनसंपर्कही चांगला आहे. इतकी वर्ष सेवा करताना कुठेही त्यांच्या संदर्भात तक्रार केली गेली नाही अशीच माहिती समोर येत आहे. एकंदरीत एखाद्या अधिकाऱ्याच्या विरोधामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवून त्यांच्यामर्फत सापळा लावून त्या सापळ्यात गुंतवण्याचे षडयंत्र रचले जाऊ शकते, तसाच काहीसा हा प्रकार असावा अशा पद्धतीची शक्यता उदगीर येथील महसूल विभागाच्या अनेक कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!