श्यामार्य कन्या विद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी

0
श्यामार्य कन्या विद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी

उदगीर (एल पी उगीले ) श्यामार्य कन्या विद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्यामार्य कन्या विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रवीण भोळे उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार व पुष्प अर्पण करून मुख्याध्यापक व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून अभिवादन करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि मराठी साम्राज्याचे संस्थापक होते. १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरीवर जन्मलेल्या महाराजांनी गनिमी काव्याच्या जोरावर स्वराज्य निर्माण केले. महाराजांचा इतिहास आपल्याला शिकवतो की शत्रू कितीही मोठा असला तरी, जर इरादे मजबूत असतील तर डोंगर सुद्धा मातीचा ढिगारा वाटतो. चला, आजच्या दिवशी शपथ घेऊया की, आपण शिवरायांच्या विचारांवर चालून एक सक्षम राष्ट्र घडवू.छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास आज तरुणांनी आत्मसात करणे काळाची गरज आहे. शिवरायांची निती, जिजाऊंचे संस्कार व शिवरायांचे संघर्ष या सर्व बाबी बारकाईने समजावून शिवशाही अमलात आणणे काळाची गरज आहे. शिवाजी महाराजांचा संघर्ष हा कुठला जात व धर्म संघर्ष नव्हता. तर शिवाजी महाराजांचा संघर्ष रयतेच्या राज्यासाठी होता. शिवराय सर्व जाती धर्माचे पुरस्कर्ते होते. त्यांच्या स्वराज्यात जाती धर्माला थारा नव्हता, अशा आशयाचे मनोगत विद्यार्थिनी प्राप्ती शिंदे, प्रिया कंदले, अनुष्का शेवाळे, श्रद्धा रुपनर, पोवाडा गीत साक्षी बिरादार आपल्या भाषणातून व्यक्त केले. शिवचरित्रावर आधारित पर्यवेक्षक विजय बैले यांनी गीत गायन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साक्षी बिरादार व स्नेहा मोरतळे यांनी केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!