23 फेब्रुवारीला रोटरी क्लबच्या उत्कृष्ट व्यवसाय सेवा पुरस्काराचे वितरण, ‘बाळकृष्ण मुक्कावार’ यांना जीवन गौरव पुरस्कार
उदगीर (एल पी उगीले) येथील रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलच्या वतीने देण्यात येणारे उत्कृष्ट व्यवसाय सेवा पुरस्कार जाहीर करण्यात आले असून येत्या सोमवारी दि. 23 फेब्रुवारी रोजी या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात शहरातील ज्येष्ठ व्यापारी बाळकृष्ण मुक्कावार यांना ‘जीवन गौरव’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
दि. 23 फेब्रुवारी रोजी रोटरी क्लब चा 121 वा वर्धापन दिन असून या निमित्ताने ‘रोटरी डे’ म्हणून हा दिवस साजरा करण्यात येणार आहे.
रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलच्या वतीने देण्यात येणाऱ्या उत्कृष्ट व्यवसाय सेवा पुरस्कारासाठी उदगीर येथील भूमिपुत्र असलेले नांदेड येथील प्रसिद्ध गॅस्ट्रोएन्टोरोलॉजी तज्ञ् डॉ. नितीन जोशी, दुसरे उदगीरचे भूमिपुत्र व हैद्राबाद येथील उद्योजक मारोती मरलापल्ले, उदगीर येथील ज्येष्ठ व्यापारी ईश्वरप्रसाद बाहेती, शिवकुमार डोईजोडे, दत्तात्रय भोसले यांची निवड करण्यात आली आहे.
सोमवारी दि. 23 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता येथील मोरया मंगल कार्यालयात या पुरस्काराचे वितरण रोटरी क्लब डिस्ट्रिक्ट 3132 चे माजी प्रांतपाल हरिप्रसाद सोमाणी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे हे राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलचे अध्यक्ष प्रशांत मांगुळकर, उपाध्यक्ष मोतीलाल डोईजोडे, सचिव विक्रम हलकीकर, प्रोजेक्ट चेअरमन बिपीन पाटील यांच्यासह रोटरी क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
