वाढवणा पोलिसांची बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर धडक कारवाई : ११ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल, 23 लाख 41 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.
उदगीर (एल पी उगीले) उदगीर तालुक्यातील मौजे वाढवणा येथील पोलीस दलाने मोठे कामगिरी करत जुगार अड्ड्यावर मोठे धाड टाकले आहे. सध्या लातूर जिल्हा पोलीस दलाने बेकायदेशीर जुगार व सट्टा व्यवसायाविरुद्ध सुरू केलेल्या विशेष मोहिमेंतर्गत पोलीस स्टेशन वाढवणा (बु), ता. उदगीर यांच्या पथकाने अत्यंत धाडसी व नियोजनबद्ध कारवाई करत मौजे मन्ना (उमरगा) शिवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून मोठा गुन्हा उघडकीस आणला आहे. सदर कारवाईत ११ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यापैकी काही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे, तर उर्वरित आरोपी फरार आहेत. या कारवाईत एकूण २३,४१,५००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे तसेच अपर पोलीस अधीक्षक, लातूर यांच्या मार्गदर्शना खाली, पोलीस स्टेशन वाढवणा (बु) चे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीरीत्या पार पाडण्यात आली.
लातूर जिल्ह्यात बेकायदेशीर जुगार व्यवसायावर आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष लक्ष ठेवण्यात येत होते. त्याच अनुषंगाने दिनांक २२/०३/२०२६ रोजी पोलीस स्टेशन वाढवणा (बु) येथील पथकास गोपनीय माहिती प्राप्त झाली की, मौजे मन्ना (उमरगा), ता. उदगीर येथील शिवारात संजय पाटील यांच्या शेताजवळील लिंबाच्या झाडाखाली काही इसम बेकायदेशीरपणे जुगार खेळत आहेत. सदर माहितीची खात्री करून पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाड टाकली. सुमारे दुपारी १५.१५ वाजण्याच्या सुमारास पोलीसांनी छापा टाकला असता आरोपी मंडळी “तिर्रट” नावाचा जुगार पत्त्यांच्या साहाय्याने खेळत व खेळवित असल्याचे आढळून आले.
सदर कारवाईत खालील आरोपींचा सहभाग आढळून आला बसून आरोपींना अटक करण्यात आली आहे ज्यामध्ये प्राधान्याने संभाजी दिगांबर पाटील (वय २८ वर्षे, रा. डाऊळ, ता. उदगीर),शिवकांत विश्वनाथ मिरजगावे (वय ३३ वर्षे, रा. खेर्डा, ता. उदगीर),
शिवकुमार राजेंद्र शेळके (रेड्डी) (वय ३८ वर्षे, रा. टाकळी, ता. उदगीर),
लईकोद्दीन शाहबुदीन चौधरी (वय ५२ वर्षे, रा. उदगीर),विलास दशरथ दहीकांबळे (वय ३५ वर्षे, रा. हाळी, ता. उदगीर),ज्ञानेश्वर नरसिंग सारोळे (वय २७ वर्षे, रा. निडेबन, ता. उदगीर),
या प्रकरणात काही आरोपी फरार झाले असून त्यामध्ये अजित श्रीधर राठोड,बालाप्रसाद ऊर्फ प्रविण सत्यनारायण गिल्डा,गोविंद बाबुराव चव्हाण (रा. निडेबन),पवन सत्यनारायण गिल्डा,रुषीकेश वाघमारे (रा. खेर्डा) यांचा समावेश असल्याचे पोलीस प्रशासनाचे म्हणणे आहे.
सदर कारवाईदरम्यान पोलीस पथकाने जुगारासाठी वापरण्यात येणारे साहित्य (पत्ते, इतर साधने) रोख रक्कम २१,५०० रुपये तसेच ज्या ठिकाणी जुगार चालू होता त्या ठिकाणी आढळलेली १० चारचाकी/दुचाकी वाहने (अंदाजे किंमत ₹२३,२०,०००/-) असा एकूण ₹२३,४१,५००/- जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलीस स्टेशन वाढवणा (बु) येथे गुन्हा क्रमांक ६९/२६ कलम १२(अ) महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवलदार बळदे हे करीत आहेत.
सदर धाडसी कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड, पोलीस अंमलदार बळदे, शिवप्रताप रंगवाळ, यांनी केली आहे. सदर प्रकरणातील अटक आरोपींवर कायदेशीर कारवाई सुरू असून फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक कार्यरत करण्यात आले आहेत. अशी माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.
