जीवन प्रयाग सेवापर्व पुस्तकाचे सभापती शिवाजीराव हूडे यांच्या हस्ते प्रकाशन संपन्न

0
जीवन प्रयाग सेवापर्व पुस्तकाचे सभापती शिवाजीराव हूडे यांच्या हस्ते प्रकाशन संपन्न

उदगीर (एल पी उगीले)जीवन प्रयाग फाऊंडेशनच्या वतीने जीवन प्रयाग सेवापर्व या पुस्तकाचे प्रकाशन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजीराव हुडे यांच्या हस्ते आणि प्रमोद कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा.संजय बिबीनवरे यांनी करून दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजीराव हुडे हे होते तर, प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्व प्रचारक प्रमोद कुलकर्णी उपस्थित होते. तसेच व्यासपीठावर फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रभात सूर्यवंशी ,सदस्य सरस्वती लाल इत्यादी उपस्थित होते .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभात सूर्यवंशी यांनी केले . सभापती शिवाजीराव हुडे बोलताना म्हणाले की, प्रभात सूर्यवंशी यांनी काढलेले हे पुस्तक तरुण पिढीला आणि समाजाला दिशा देणारे आहे,समाजात सेवा देण्याचे कार्य जीवन प्रयाग फाउंडेशनच्या वतीने केले असून समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, या भावनेने केलेली कार्य समाजाला समृद्ध बनवण्यासाठी उपयुक्त आहे, याचा विचार करून पिढीने करणे गरजेचे आहे. असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रमोद कुलकर्णी बोलताना म्हणाले की, गरजवंतापर्यंत सेवा पोहोचवण्याचे काम आणि यातूनच समाजाला उन्नत करण्याची भावना मनात ठेवून फाऊंडेशनच्या वतीने आज पर्यंत कार्य केले आहे.वंचित आणि उपेक्षित घटकाला सेवेच्या माध्यमातून मदतीचा हात पुढे करून उपेक्षित समाजाला समृद्ध बनविण्यासाठी फाऊंडेशनचे कार्य कायमच प्रेरणा देणारे आहे, असे विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. वैभव शेळके यांनी तर आभार प्रा . संजय बिबीनवरे यांनी मानले . कार्यक्रमास नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!