शिवाजीराव कोंडमगिरे (रेड्डी) यांची राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी नियुक्ती

0
शिवाजीराव कोंडमगिरे (रेड्डी) यांची राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी नियुक्ती

उदगीर(एल पी उगीले)अमॅच्युअर कबड्डी फाउंडेशन ऑफ इंडिया,अमॅच्युअर कबड्डी फाउंडेशन ऑफ महाराष्ट्र व अमॅच्युअर कबड्डी असोशियन ऑफ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 35 व्या सब ज्युनिअर राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी तांत्रिक अधिकारी म्हणून लातूरचे सुपुत्र शिवाजीराव बापूराव कोंडमगिरे( रेड्डी) यांची महत्त्वपूर्ण नियुक्ती करण्यात आली आहे .येत्या दोन ते चार एप्रिल 2026 या कालावधीत पुणे जिल्ह्यातील आळंदी येथील संत ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या प्रांगणात या राष्ट्रीय स्पर्धेचा थरार राहणार आहे. या मोठ्या क्रीडा महोत्सवाचे नियोजन अत्यंत चौख असावी यासाठी देशभरातील अनुभवी पंचांची आणि तांत्रिक अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये तांत्रिक अधिकारी म्हणून शिवाजीराव कोंडमगिरे यांच्या नावावर शिक्का मोर्तब झाले आहे.
बहुआयामी व्यक्तिमत्व:-
शिवाजीराव कोंडमगिरे हे स्वतः एक राष्ट्रीय स्तरावरील कबड्डी खेळाडू असून ते राज्यस्तरीय कबड्डी पंच म्हणूनही ओळखले जातात. सध्याचे राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी लातूर विभागात सहाय्यक पदावर कार्यरत आहेत .तसेच एसटी -कष्टकरी जनसंघ लातूरचे विभागीय सचिव म्हणूनही ते कामगारांच्या प्रश्नासाठी सक्रिय असतात.

एसटी महामंडळ व क्रीडा वर्तुळातून कौतुक

त्यांच्या या निवडीमुळे लातूर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे .त्यांच्या या यशाबद्दल एसटी महामंडळातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी वर्ग, एसटी कष्टकरी जनसंघाचे पदाधिकारी आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवराकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .35 व्या राष्ट्रीय सब ज्युनिअर कबड्डी स्पर्धेत तांत्रिक जबाबदारी सांभाळताना त्यांच्या अनुभवाचा मोठा फायदा खेळाडूंना आणि संयोजकांना होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. त्यांच्या या निवडीबदल सर्व क्रिडा शिक्षकाकडून कौतुक केले जात आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!