महिला आरक्षणावरून काँग्रेसविरोधात शिवसेना महिला आघाडी आक्रमक

0
महिला आरक्षणावरून काँग्रेसविरोधात शिवसेना महिला आघाडी आक्रमक

लातूर (प्रतिनिधी) लोकसभेतील ३३ टक्के महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यामुळे काँग्रेस पक्षाच्या भूमिकेविरोधात शिवसेना महिला आघाडी, लातूर शहराच्या वतीने गांधी चौक येथे तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले.
शिवसेना प्रमुख नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार, उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या सूचनेवर तसेच महिला संपर्कप्रमुख रंजना कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन पार पडले.
जिल्हाप्रमुख सचिन दाने यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात महिला जिल्हाप्रमुख जयश्री भुतेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत निषेध नोंदवण्यात आला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी काँग्रेस पक्षावर महिलांच्या सन्मानाचा अवमान केल्याचा आरोप करत जोरदार घोषणाबाजी केली.
या आंदोलनात जयश्री भुतेकर, दिशा देशमुख, प्रीती कोळी, सुरेखा गाडेकर, रेणुका गिरी, संजना निटूरे, सुमित्रा बनसोडे, बाबुराव शेळके, सदाशिव गव्हाणे, मोहन दिवटे, संजय सोनकांबळे, पवन रणदिवे, सज्जाद शेख, बाळासाहेब दांडिमे यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!