राष्ट्रभक्‍त स्वामी विवेकानंदाची भविष्यवाणी मोदीजीच पूर्ण करतील

राष्ट्रभक्‍त स्वामी विवेकानंदाची भविष्यवाणी मोदीजीच पूर्ण करतील

स्वामी विवेकानंदानी जागतिक धर्मपरिषदेमध्ये भारताचे प्रतिनिधीत्त्व अत्यंत प्रभावीपणे केले होते. यापुर्वी कोणाच्याही अध्यात्मिक विचाराने परकीय विचारवंत प्रभावित झालेले नसतील तेवढे शिकागो येथील धर्मपरिषदेमध्ये स्वामी विवेकानंदाच्या विचाराने प्रेरीत झाले. हिंदू धर्म व भारतीय आध्यात्म हे सर्व धर्माचा आदर करून चांगल्या व मानवतावादी विचाराचे स्वागत करणारा आहे. सर्व जग हे एक कुटुंब समजून त्याच्या कल्याणाचा विचार करणारा, वेदावरती आधारीत अशी ही आध्यात्मिक विचारसरणी असल्याचे जगाला विश्‍वास देण्यासाठी स्वामी विवेकानंद यशस्वी झाले होते. विवेकानंदाचे आपल्या मातृभूमीवरती अलोट प्रेम होते. त्यांचे देशातील तरूणावर, लोकांवर पूर्ण विश्‍वास होता. त्यातून त्यांनी अशी भविष्यवाणी केली होती की, भारत 21 व्या शतकामध्ये संपुर्ण जगाचे नेतृत्त्व करू शकेल. भारताचे पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांची प्रेरणा, ऊर्जा ही भारतीय अध्यात्माचे संस्कार व स्वामी विवेकानंदाचे विचार असल्याचे त्यांनी आपल्या व्याख्यानातून अनेकवेळा सांगितलेले आहे. त्यांच्या सारखीच प्रेरणा माझ्यासारख्या असंख्य अभ्यासकालाही देण्याचे काम स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद, छत्रपती शिवाजी महाराज व भारतीय अध्यात्म सतत करत आलेलेे आहे, हे वास्तव सत्य आहे.

भारताचे पंतप्रधान श्रीमान नरेंद्र मोदी यांची आयुष्यातील वाटचाल पाहिल्यानंतर त्यांनी अनेक संकटावर यशस्वी मात करीत एक चहा विकणारे सामान्य कुटुंबातील तरूण ते भारतासारख्या बलाढ्य देशाचे पंतप्रधानपद संपादन करण्याचे कार्य, कठोर परिश्रम, स्वच्छ चारित्र्य, प्रचंड आत्मविश्‍वास, देश व जागतिक प्रश्‍न समजून घेण्याची क्षमता, देशावरील त्यांची निष्ठा, प्रेम व भारतीय अध्यात्म व राष्ट्रभक्‍त स्वामी विवेकानंदाच्या विचारांची प्रेरणा यातून शक्य झाले, असे त्यांच्या वक्‍तव्यातून वाटते. सन 2009 च्या लोकसभा निवडणूक प्रचारासाठी मोदीजी लातूरला आले होते, त्या सभेची तयारी आम्ही सर्वांनी केली होती. सभा अत्यंत प्रभावी व चैतन्यपूर्ण यशस्वी झाली होती. त्यावेळेस त्यांच्या शेजारी बसण्याची व सहवासाची संधी लाभली होती.

  1. श्री.नरेंद्र मोदी तपश्‍चर्या करण्यासाठी साधू म्हणून बेलूर, रामकृष्ण मठ येथे गेले असता तेथील प्रमुख आत्मस्थानंदजी महाराज यांनी जनसेवा हीच ईश्‍वर सेवा असल्याचे सांगितले. त्यावरून मोदीजींनी संन्यास घेण्याऐवजी समाज व राष्ट्र उभारणीच्या कार्यात स्वःताला समर्पित केल्याचे त्यांच्या कार्यावरून दिसले. ते तेथून हिमालयात गेल्याची माहिती आहे, तेथे काही दिवस राहून तेथून ते परत (वडनगर जि.मेहसना) गुजरातमध्ये परत आले व तेथेच त्यांनी चहाचा व्यवसाय सुरू केला तो करीत असताना संघाचे प्रचारक अ‍ॅड.लक्ष्मणराव इनामदार जे महाराष्ट्रीयन आहेत. यांचा संपर्क आला. व ते संघाशी जोडले गेले. आणीबानी व त्यानंतर संघामार्फत श्री.मोदीजींनी अत्यंत चांगले कार्य केले व त्यानंतर भाजपा पक्षातील गुजरात राज्याचे संघटन मंत्री म्हणून सन 1987 साली जबाबदारी देण्यात आली. यात त्यांनी पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी मोठे योगदान दिले. तेथून त्यांना भाजपाच्या राष्ट्रीय स्थरावर जबाबदारी दिली. व काही राज्याची प्रमुख जबाबदारी दिली होती. तसेच त्यांना पुढे गुजरातच्या राजकीय परिस्थीतीमध्ये परिवर्तन घडविण्यासाठी मोदीजींना सन 2001 मध्ये मुख्यमंत्री करण्यात आले. या काळात त्यांनी गुजरातला देशात विकासाचे मॉडेल बनविले. कृषी, सुशिक्षीत बरोजगार, उद्योगाला त्यांनी मोठी चालना दिली. त्यामुळे त्यांच्या परिचय देशाला प्रभावी प्रशासक व “विकासपुरूष” म्हणून झाला. त्यामुळेच गुजरातच्या 3 विधानसभा मोदीजींच्या नेतृत्त्वाखाली मोठ्या मताधिक्याने जिंकल्या गेल्या. देशस्थरावर त्यांना भाजपाचे भावी पंतप्रधान उमेदवार म्हणून ओळखले जाऊ लागले. सन 2009 लोकसभा निवडणुकीअगोदर मा.मोहन भागवतजी यांना नागपूर येथे जाऊन मी भेटलो होतो. तेंव्हा विविध प्रश्‍नावर चर्चा होत असताना मोदीजींना 2009 लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान उमेदवार म्हणून जाहीर केल्यास निवडणूक जिंकण्यास भाजपाला सोपे जाईल. त्यावेळस मोहन भागवतजीने मोदीजी सन 2014 लोकसभा निवडणूक पंतप्रधान उमेदवार आहेेत, असे सांगितले होते. त्याप्रमाणे पक्षाने त्यांना सन 2014 च्या पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून घोषीत केले व त्यांनी 26 मे 2014 रोजी देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. देशामध्ये पुर्ण बहुमताचे एका विरोधी पक्षाचे सरकार बवनवण्याचा बहुमान मोदीजींना पहिल्यांदा मिळाला.

पंतप्रधानपदाच्या काळात त्यांनी देशातील केंद्र सरकारमधील भ्रष्टाचाराला प्रचंड प्रमाणात आळा घातला. गेल्या 6 वर्षामध्ये शासनावरती भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही. त्यांनी जागतिक स्थरावर अमेरिका, रशीया, फ्रान्स, जर्मनी सारख्या असंख्य देशासोबत स्नेहाचे, मित्रत्त्वाचे संबंध ठेवले. त्यामुळे सुप्रिम कोर्टाचे न्यायमुर्ती मा.अरून मिश्राजी म्हणतात की, मोदी यांचे दृष्टेपण जागतिक स्थरावर मान्य करण्यात आले. ते बुध्दिमान आहेत. जागतिक स्थरावर विचार करीत असले तरी त्यांचे निर्णय देशहिताचे असतात. मोदीजींच्या नेतृत्त्वात भारत हा जबाबदार आणि आंतरराष्ट्रीय समुदायाच्या अत्यंत जवळचा मित्र बनला आहे. “पुलवामा एअर स्ट्राईक” पाकीस्थानने 14 फेब्रुवारी 2019 रोजी सी.आर.पी.एफ.च्या वाहनावर बॉम्ब टाकला त्याला चोख प्रतिउत्तर देण्यासाठी 26 फेब्रुवारी 2019 रोजी पाकीस्थानमधील बालाकोट येथील अतिरेक्याचे आड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. यापूर्वीही उरी येथील सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून अतिरेक्यावरती 29 सप्टेंबर 2016 रोजी हल्‍ला करण्यात आला होता. त्यामुळे जगात व देशात मोदीजींच्या धाडसी कार्यवाहीचे कौतुक करण्यात आले. व जगात त्यांचा दबदबा निर्माण झाला. जगाच्या विविध देशामध्ये भारतीय मोठ्या प्रमाणात राहतात त्यांच्यामध्ये देशप्रेम जागे करण्याचे कार्य त्या देशातील भव्य कार्यक्रमातून मोदींनी करून दाखविले. त्यामध्ये प्रामुख्याने यु.के.मधील “वेम्बली स्टेडीयम” मधील कार्यक्रम व अमेरिकेमधील “ह्युज टन” मधील “हाऊडी मोदी” या कार्यक्रमाला अमेरिकेेचे राष्ट्रपती मा.श्री.ट्रंप उपस्थित हेाते. यावेळी 50 हजार भारतीय नागरिकांनी मोदीजींचे उत्स्फुर्त स्वागत केले. यातून अनेक भारतीय उद्योगासाठी भारतात गुंतवणूक करीत आहेत. यामध्ये गुगल कंपनीचे भारतीय सी.ई.ओ. सुंदर पिचाई यांनी 70 हजार कोटीची गुंतवणूक केली,असेही काही उद्योजक आहेत. देशामध्ये इंग्रजकालीन असलेली शिक्षणपध्दती बदलून घोकम्पट्टीला महत्त्व न देता आधात्म, विज्ञान व व्यावसायीकतेद्वारा तरूण घडविणार्‍या शिक्षणाला केंद्र सरकारने मान्यता देण्याचा क्रांतीकारी निर्णय घेतला. जगातील 121 देशांची सोलार व अलायन्स मोदींच्या पुढाकारातून झाला. भारतीय महर्षी पतंजलिची गौरवशाली विद्या योगाचे महत्त्व जगाला पटवून दिले. त्यामुळे युनोने 21 जून हा जागतिक योग दिवस मान्य केला. हा भारताचा गौरव आहे. पर्यावरण संदर्भात “पॅरीस अ‍ॅग्रीमेंट क्‍लायमेंट” चेंज करार केला. अमेरिका राष्ट्रपतीसाठी नमस्ते ट्रंप हा कार्यक्रम लाखोंच्या उपस्थितीत गुजरातध्ये घेतला. कोरोना संकटकाळात मोदीजींनी कोरोना औषध “हायड्रोक्सी क्‍लोरोक्‍वीन” वरील निर्यात निर्बंध शिथील केले. त्यामुळे हे औषध ब्राझीलसाठी व इतरांसाठी संजिवनी ठरले. असे ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर.एम.बोत्सनाटो यांनी मोदींजीचे कौतुक करून त्यांना हनुमानाची उपाधी दिली. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष श्री.ट्रंम्प यांनी मोदी हे महान व चांगले नेते आहेत. असे वक्‍तव्य केले. अमेरिका न्ययार्क टाईम्स यांनी कोरोना संकटाच्या काळात मोदींनी जे निर्णय घेतले. त्यामुळे मोदीजींची लोकप्रियता जगात रशियाचे अध्यक्ष पुतीन व अमेरिकेचे अध्यक्ष ट्रंप्सपेक्षा अधिक वाढली. असे एका सर्वेक्षणातून नुकतेच समोर आलेले आहे. मोदींनी जगाच्याबरोबर आपले संबंध दृढ केले. त्याबरोबरच देशामधील अनेक जनहिताचे व देशहिताचे क्रांतीकारी निर्णय घेतले. यामध्ये नोटाबंदी करून दहशतवादी लोकांकडील व काळ्या पैशाला कंट्रोल केले. जी.एस.टी.कायदा लागू करून सर्व देशात एकसारखा टॅक्स व यातून देशाचे आर्थिक उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. विशेषतः भाजपाच्या वैचारिक अधिष्ठानाचा आधार घेत तो विचार 370 कलम रद्द करने, भगवान रामाचे मंदिर उभारणी, समान नागरी कायदा, तीन तलाक बंदी, दहशतवाद विरोधी कायदा, देशातील शेतकर्‍यांसाठी एफ.आर.पी.प्रमाणे सपोर्ट प्राईज देणेबाबत व शेतीमालातील काही वाण अत्यावश्यक सेवेतून कमी करणे, शेतीमाल विक्रीसाठी बाजारसमिती आवाराबाहेर विकण्याची परवानगी देण्यासाठी वटहुकुम काढण्यात आला. आणि सर्वसामान्य जनतेला मोफत गॅस, बँक अकाऊंट, विनातारण कर्ज सुविधा येत्या 2020 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर करण्याची घोषणा भारतीय स्पेस संस्थेतर्फे सन 2024 मध्ये इंडियन ह्युमन चंद्रावर जाणार असे आत्मनिर्भर मिशन अंतर्गत हे उदिष्ट्य पूर्ण करणार हा आत्मविश्‍वास मोदीजीने व्यक्‍त केला. व अशा अनेक क्रांतीकारी निर्णयामुळे सन 2014 मध्ये 31 टक्के मतदारांनी भाजपा व मोदीला मते देऊन 282 खासदार निवडून दिले. तर सन 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीपुर्वी पेक्षा अधिक 39 टक्के मते व 303 खासदार निवडून दिले. अशा अनेक योजना सर्व घटकासाठी राबविल्यामुळे मोदीजींना जागतिक स्थरावर अवार्ड देवून सन्मानित करण्यात आले. ज्यामध्ये रशियाने “अ‍ॅर्डर ऑफ द सेंट अण्ड्रयुदए पोस्टल” सर्वोच्च पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.अरब अमीरात पुरस्कार असे सहा देशांनी पुरस्कार देवून गौरव केलेला आहे. कोरोना महासंकटामुळे जगातील सर्वच देशाची आर्थिक परिस्थिती अडचणीत आली. ज्यामध्ये अमेरिका 5.7 टक्के, ब्रिटन 7 टक्के, इटली 8.2 टक्के याप्रमाणे भारताची अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे. “मुडीज इन्व्हेस्टर्स सर्विसेस” या जगातील संस्थेने भारतीय अर्थव्यवस्था सन 2021 म्हणजे पुढील वर्षी 6.2 टक्के जी.डी.पी. असेल असे जाहीर केले. यामुळेच येणार्‍या काळात 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था करण्याचा संकल्प मोदीजींना केला आहे. ज्या पध्दतीने देशाच्या विकासाच्या सर्व मुलभूत प्रश्‍नाला प्राधान्य देवून पुढे घेवून जाण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे देशाचा शाश्‍वत विकासाचा पाया मजबूत असल्याचे भाकीत “जागतिक बँकेने” व्यक्‍त केले आहे. कोरोना संकटामध्ये देशातील सर्व क्षेत्रातील जनतेला आधार देण्यासाठी 21 लाख कोटी रूपयांचे पॅकेज जाहीर केले असून त्यातून जो आधार देण्याचा सर्व क्षेत्रासाठी प्रयत्न केला. त्यामुळे निश्‍चितच देशाची प्रतिमा उंचावली आहे. हे सर्व मोदींजी व त्यांचे जेष्ठ सहकारी ना.अमीतभाई शहा, ना.श्री.राजनाथसिंहजी, ना.नितीनजी गडकरी, ना.रावसाहेबजी दानवे व राज्यामध्ये ना.देवेंद्रजी फडणवीस , आ.चंद्रकांतदादा पाटील यांच्या गतिमान विकासकामातून भारत मोदीजींच्या नेतृत्त्वाखाली जगाचे नेतृत्त्व करेल व राष्ट्रभक्‍त स्वामी विवेकानंदजी व पुर्व राष्ट्रपती अब्दुल कलाम यांची भविष्यवाणी पूर्ण करून भारत गौरवाच्या शिखरावर पोहोचेल, असा विश्‍वास वाटतो.

शिवाजीराव पाटील कव्हेकर
माजी आमदार, लातूर

About The Author