भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती उत्साहात साजरी

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती उत्साहात साजरी

लातूर (प्रतिनिधी) : दयानंद कला महाविद्यालयाच्या वतीने दि.१४ नोव्हेंबर रोजी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.याप्रंसगी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी महाविद्यालयीन लिपीक रामकिशन शिंदे यांनी असे प्रतिपादन केले की, पंडित जवाहरलाल नेहरू हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्त्वपूर्ण नेतृत्व व आंतरराष्ट्रीय राजकारणातील एक मुत्सद्दी नेतृत्व असून त्यांनी भारताच्या विकासासाठी पंचवार्षिक योजना, अलिप्ततावादी धोरण, हरित क्रांतीची मुहूर्तमेढ, कृषी क्षेत्रातील औद्योगिक धोरणाची सुरुवात, जलसिंचन प्रकल्प, जलविद्युत निर्मिती प्रकल्प, पंचशील तत्वे यासारख्या महत्त्वपूर्ण निर्णयांमध्ये योगदान देऊन भारताला स्वयंपूर्णतेकडे घेऊन जाण्याचे कार्य पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केले. असे प्रतिपादन यांनी याप्रसंगी केले.

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अभिवादन कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, उपप्राचार्य अनिलकुमार माळी,पर्यवेक्षक डॉ.दिलीप नागरगोजे , डॉ.शिवाजीराव जवळगेकर, डॉ.रमेश पारवे, प्रा.विवेक झंपले,प्रा. महेश जंगापल्ले, डॉ.अपर्णा पसारकर, प्रा.अंगद भुरे, डॉ.एम.बी.घुमे, कार्यालय अधीक्षक नवनाथ भालेराव, रामकिशन शिंदे, अविनाश आदमाने आदी उपस्थित होते .

About The Author