जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनल च्या उमेदवारांना निर्णायक मताधिक्य द्यावे
आमदार धीरज देशमुख यांचे आवाहन
लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून या भागातील शेतकरी सभासद याना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सुरु आहे बँकेने अनेक धाडसी निर्णय घेवून शेतकरी सभासदांना न्याय देत आर्थिक सुबत्ता मिळाली राज्यात पाच लाख रुपयांपर्यंत शून्य टक्के दराने पिक कर्ज देण्याचा ऐतिहासिक निर्णय याच बँकेने घेतला ही विकासाची साखळी पुढें चालु ठेवण्यासाठी या निवडणुकीत काही जूने नवे संचालक मंडळ याना संधी दिली आहे सर्वांना सोबत घेवुन यापुढेही चांगल काम करण्याचा प्रयत्न सहकार पॅनल च्या माध्यमातून होणार आहे यासाठी तालुक्यातील मतदारांनी एकत्रीत येवून मतदान करून निर्णायक मताधिक्य द्यावे असे आवाहन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तथा लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी केले आहे ते मंगळवारी लातूर तालुक्यातील हरंगुळ खू येथे आयोजीत सहकार पॅनल च्या प्रचारार्थ प्रचार सभेत ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक २०२१ च्या सहकार पॅनल चे अधिकृत उमेदवार सौ स्वयं प्रभा पाटील, सौ अनिता केंद्रे, सौ सपना किसवे, अनुप शेळके, धनराज पाटील, बँकेचे संचालक राजकुमार पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
ग्रामीण भागातील लोकांना अडीअडचणीला धावून जाणारी बँक
यावेळी बोलताना आमदार धीरज देशमुख म्हणाले की गेली तीन दशके या भागातील लोकांचे आपले नाते राहीलेले आहेत विकासाच्या अनेक योजना राबविल्या आहेत साखर कारखाना व बँकेच्या माध्यमातुन या दोन्ही संस्थेतून या भागांतील शेतकरी सभासद याना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम केले आहे त्यामूळे ग्रामीण भागातील विविध कार्यकारी सोसायटी या सक्षम झाल्या इथला शेतकरी स्वावलंबी झाला यामागे जिल्हा बँक, साखर कारखाना यांचे योगदान राहीलेले आहे असे सांगून मला विधानसभा निवडणुकीच्या काळात मला ज्या पद्धतीनं आशिर्वाद दिला त्यांचं पद्धतीनें होणाऱ्या निवडणुकीसाठी सहकार पॅनल च्या सर्व उमेदवारास अधिक मताधिक्य द्यावे असे आवाहन त्यांनी केले.
बँकेच्या माध्यमातून नवीन योजना राबवणार
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक वेगवेगळ्या योजना बँक राबवत आहे अनेक धाडसी पाऊल पुढे टाकत असताना अजून नवीन काही करता येईल का यासाठी कुक्कुट पालन, दूग्ध व्यवसाय, तरुणांना रोजगार मिळेल अशा काही योजना राबवून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्याचे प्रयत्न बँकेच्या माध्यमातून आगामी काळात करणार असल्याचे आमदार धीरज देशमुख त्यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी विलास साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रविंद्र काळे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष प्रवीण पाटील, गोविंद बोराडे, मांजरा साखर कारखान्याचे संचालक कैलास पाटील तालुक्यातील विविध गावातील मतदार उपस्थित होते.