लातूर जिल्हा बँकेने सहकार क्षेत्रात वेगळा पॅटर्न निर्माण केला
सहकार पॅनल उमेदवारांच्या प्रचारार्थ आमदार धीरज देशमुख यांच्या लातूर तालुक्यात बैठकीला मोठा प्रतिसाद
लातूर (प्रतिनिधी) : जिल्ह्याचा शिवराज पाटील चाकूरकर, शिवाजीराव पाटील निलंगेकर, विलासराव देशमुख यांनी सहकाराच्या माध्यमातून जिल्ह्याचा ३० वर्षात कायापालट करत आमुलाग्र बदल केला. एवढ्यावरच आपल्याला थांबायचे नाही. या विकासाला समाजाच्या मागणीनुसार आणखी गती देण्याचे काम करायचे आहे. आपली स्पर्धा राज्य व देशातील बँकांशी असुन लातूर जिल्हा बँकेने सहकार क्षेत्रात वेगळा पॅटर्न निर्माण केला आहे. त्यामुळे चांगल्यांना अधिक चांगले करण्याची जबाबदारी आपली आहे. शेतकरी, मजूर, महिला, सुशिक्षित बेरोजगार, विद्यार्थी यांसाठी अनेक योजनांच्या माध्यमातून कर्ज सुविधा देण्याचे काम जिल्हा बँकेने केले आहे अशी माहिती जिल्हा बँकेचे संचालक तथा आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी येथे बोलताना दिली ते लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकी च्या सहकार पॅनल उमेदवारांच्या प्रचारार्थ लातूर तालुक्यातील जोड जवळा येथे आयोजित मतदार संवाद बैठकीत बोलत होते.
यावेळी बोलताना धीरज देशमुख म्हणाले की येणाऱ्या काळातही बँकेच्या माध्यमातून गरजू शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार यांसाठी रेशीम शेती, यांत्रिक, सुधारित शेती, प्रक्रिया उद्योग, पशुपालन यातून आर्थिक सक्षम करुन या भागाचा विकास करायचा आहे. तसेच महिला व मुलींनाही मुख्य प्रवाहात आणण्यांसाठी चांगल्या योजना राबविल्या जाणार आहेत. यासाठी भरीव निधी उपलब्ध करुन देता येईल.
जिल्हा बँकेला पुनर्वसनातून बाहेर काढून यशाच्या शिखरावर नेण्याचे कार्य दिलीपराव देशमुख यांनी केले
यावेळी माजी आमदार वैजनाथ शिंदे म्हणाले की,
थकबाकीने डबघाईला आलेल्या जिल्हा बँकेला दिलीपराव देशमुख यांनी बाहेर काढून यशाच्या शिखरावर नेले आहे. यामागे त्यांचे कठोर परिश्रम व काटेकोर व्यवस्थापन आहे. दिलीपराव देशमुख साहेबांकडे जिल्हा बँकेची सूत्रे आल्यानंतर बँकेची थकीत बाकी वसूल करण्यासाठी स्वत:च्या हस्ताक्षरात थकबाकीदारांना पत्र लिहिले. जिल्ह्यात वसुली मेळावे लावले. काहींना बोलवून त्यांना थकबाकी भरण्याची विनंती केली. त्यामुळेच जिल्हा बँक आपली सर्वसामान्यांची बँक म्हणून काम करते आहे. जिल्हा बँक संचालकांच्या रुबाबासाठी नसते तर ती सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी असते, या नियमानुसार बँकेचा पारदर्शक कारभार दिलीपराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली झाला म्हणूनच बँकेने राज्यात नावलौकिक मिळविला आहे. शेतक-यांना स्वाभिमानाने जगण्यासाठी आधार देणा-या जिल्हा बँकेची दिमाखात वाटचाल सुरु आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या माध्यमातून लातूरला सुजलाम सुफलाम करणा-या दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखालील सहकार पॅनलच्या पाठीमागे उभे रहावे, असे आवाहन श्री शिंदे यांनी केले.
यावेळी अरुण कापरे, किशन लोमटे शास्त्री मालक, कैलास पाटील, सौ दैवशा ला राजमाने, बबनराव ढगे, प्रवीण पाटील, ज्ञानेश्वर भिसे, पालकर, काळे, सहकार पॅनल चे उमेदवार, मतदार उपस्थित होते.