उदगीर शहरातील विविध खाजगी दवाखान्यात मोफत कोवीड लसीकरण आणि आयुर्वेदिक तपासणी-औषधोपचार शिबिर

उदगीर शहरातील विविध खाजगी दवाखान्यात मोफत कोवीड लसीकरण आणि आयुर्वेदिक तपासणी-औषधोपचार शिबिर

उदगीर ( प्रतिनिधी ) : कोवीड लसीकरणासाठी शासकीय यंत्रणांवर पडणारा ताण काही अंशी कमी करावा या उद्देशाने उदगीर डॉक्टर्स वुमेन्स फोरम,सामान्य रुग्णालय व धन्वंतरी आयुर्वेद कॉलेज,उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने उदगीर शहरातील विविध खाजगी दवाखान्यात गुरुवार दिनांक:-18 नोव्हेंबर2021 व गुरुवार,दिनांक:-25 नोव्हेंबर2021 आणि मंगळवार दिनांक:-30 नोव्हेंबर2021 या रोजी सकाळी ठीक दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत 18 वर्षावरील सर्व नागरिकांना मोफत कोवीड लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

सदरील कोवीड लसीकरण शिबिराच्या दिवशीच संबंधित दवाखान्या पैकी काही ठिकाणी आजादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमांतर्गत हमारा आयुष-हमारा स्वास्थ्य व सर्वांसाठी आरोग्य तथा आयुर्वेदा फॉर पोषण या संकल्पनेनुसार मोफत आयुर्वेदिक रोगनिदान व औषधोपचार शिबिराचे सुद्धा व कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना रोगप्रतिकारक्षमता वाढण्यासाठी आवश्यक ते समुपदेशन व आहार-विहार विषयक मार्गदर्शन-जनजागरण अभियान सुद्धा राबविण्यात येणार आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग,कोवीड-19 आजाराच्या गंभीर दुष्परिणाम,म्युकॉर्मायकॉसिस सारखी शारीरिक विकृती व अन्य(मधुमेह,दमा,उच्चरक्तदाब,ईत्यादी)आजारांमध्ये कोवीड संसर्ग बळावल्याने येणारी रोगाची असाध्यावस्था व मृत्यू टाळण्यासाठी कोवीशिल्ड किंवा कोवॅक्सीन लसीचा नियमानुसार पहिला किंवा दुसरा डोस घेऊन स्वतःच्या आरोग्याचे रक्षण करावे व तसेच मोफत आयुर्वेदिक तपासणी व आवश्यकतेनुसार औषधोपचार शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.दत्तात्रय पवार,धन्वंतरी आयुर्वेद कॉलेजचे प्राचार्य डॉ.दत्तात्रय वि.पाटील,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत कापसे,उदगीर डॉक्टर्स वुमेन्स फोरमच्या अध्यक्ष डाॅ.ज्योती मध्वरे,उपाध्यक्ष डाॅ.सुप्रिया पाटील,सचिव डाॅ.प्राजक्ता गुरुडे,कोषाध्यक्ष डाॅ.कांचन मोरे,सहसचिव डॉ.प्रतिभा केंद्रे,लसीकरण मोहीमेचे नोडल ऑफिसर डाॅ.अजय महिंद्रकर व डाॅ.रामेश्वर चोले आणि डाॅ.स्वाती पाटील,डाॅ.उषा काळे,डाॅ.रेखा रेड्डी,डाॅ.अरुणा मालशेटवार,डाॅ.संतोषी मलगे,डॉ.मुसर्रत अत्तार,डाॅ.गौतमी बांगे,डाॅ.रश्मी चिद्रे,डाॅ.सबा खान परभणीकर,डॉ.पुष्पा जाधव व तसेच डाॅ.नारायण जाधव,डाॅ.मंगेश मुंढे,रा.से.यो.समन्वयक डाॅ.वैभव बिरादार,डाॅ.विशाल अनवले,डॉ.पल्लवी पवार,डाॅ.वर्षा वैद्य,डाॅ.सुप्रिया चिकमुर्गे, डॉ.दिप्ती चौधरी,डॉ.सुप्रिया वायगावकर तथा उदगीर डाॅक्टर्स वुमेन्स फोरम,सामान्य रुग्णालय व धन्वंतरी आयुर्वेद कॉलेज,उदगीरचे सर्व डॉक्टर्स,पदाधिकारी-सदस्य व रुग्णालयीन कर्मचारी यांनी केले आहे.

About The Author