मतदारांना रमेशअप्‍पांच्‍या प्रयत्‍नातून मतदानाचा अधिकार मिळाला

मतदारांना रमेशअप्‍पांच्‍या प्रयत्‍नातून मतदानाचा अधिकार मिळाला

लातूर (प्रतिनिधी) : सहकार क्षेत्रातील निवडणुकाच होवू द्यायच्‍या नाहीत अशी नीती सत्‍ताधारी देशमुखांनी अवलंबून आजपर्यंत अनेक संस्‍था ताब्‍यात ठेवल्‍या. जिल्‍हा बँकेच्‍या निवडणुकीत विरोधकांचे अर्ज बाद करून लोकशाहीचा खून केला. मतदारांचा अधिकार हीरावून घेण्‍याचे पाप केले असून आ. रमेशअप्‍पा कराड यांच्‍याच प्रयत्‍नामुळे आज खऱ्या अर्थाने मतदारांना मतदान करण्‍याचा अधिकार मिळाला आहे. तेव्‍हा जिल्‍हा बँकेच्‍या निवडणुकीत लोकशाही जिवंत ठेवण्‍यासाठी लोकशाही बचाव पॅनलच्‍या कपबशी याच चिन्‍हाला मत देवून साथ द्यावी असे आवाहन भाजपाचे नेते माजी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केले आहे.

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतील लोकशाही बचाव पॅनलच्या प्रचारार्थ भाजपाचे नेते माजी पालकमंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर आणि भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांनी मंगळवारी चाकुर, अहमदपूर आणि उदगीर येथे मतदारांच्या भेटी घेऊन लोकशाही बचाव पॅनलची भूमिका विशद केली. या तिन्‍ही बैठकीस भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाके, माजी आमदार गोविंदअण्‍णा केंद्रे, जिल्हा सरचिटणीस संजय दोरवे, त्र्यंबकआबा गुट्टे, रामचंद्र तिरूके, अशोक काका केंद्रे, जिप अध्‍यक्ष राहूल केंद्रे, सभापती रोहिदास वाघमारे, बस्‍वराज बागबंदे, बापुराव राठोड, भागवत सोट, ज्ञानेश्वर चेवले, उमेदवार ओमप्रकाश नंदगावे, भगवानराव पाटील, सुरेखा रमाकांत मुरुडकर, बाबु खंदाडे, शिवाजी बैनगिरे, अरविंद नागरगोजे, बस्‍वराज रोडगे, बालाजी गवारे, उदय ठाकूर, हनुमंत देवकते यांच्‍यासह वसंतराव डीघोळे, पंडीतराव सुकणीकर, अमोल निडवदे, सोमेश्‍वर सोप्‍पा, बालाजी केंद्रे, शामल कारामुंगे, उत्‍तरा कलबुर्गे, बबलू पठाण, भगवान सोळुंके, तुकाराम मद्दे, संतोष माने, सिद्धेश्वर पवार, प्रशांत बीबराळे, सजन लोणावळे, श्याम मुंजाने, दयानंद पाटील, रामदास खंदारे, व्यंकटराव सोनवणे, महेश पाटील, गोविंद कांडनगिरे, जयश्री केंद्रे, गयाताई शिरसाट, निळकंठ गोरटे, रामानंद मुंडे, रमेश कांबळे, दत्तात्रय जमालपुरे, प्रताप पाटील यांच्यासह जिल्‍हा बँकेच्‍या विविध गटातील मतदार, भाजपाचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्‍हा बँकेचा कारभार अत्‍यंत चांगला आणि पारदर्शक आहे तर सत्‍ताधाऱ्यांना निवडणुकीला सामोरे जाण्‍यास भिती का वाटली असा प्रश्‍न उपस्थित करून आ. संभाजीराव पाटील निलंगेकर म्‍हणाले की, शेतकऱ्यांसाठी असलेल्‍या जिल्‍हा बँकेचा मोठया प्रमाणात पतपुरवठा देशमुखांनी आपला उद्योग व्‍यवसायांना केला. शेतकऱ्यांना साडेबारा टक्‍के आणि त्‍यांच्‍या उद्योगांना नउ टक्‍के व्‍याजाची आकारणी केले जाते. नुसत्‍या घोषणा केल्‍या मात्र यांनी शेतकऱ्यांचे कधीच हित साधले नाही. ज्‍यांना आपण खुर्चीवर बसवतो त्‍यांच्‍याकडूनच न्‍यायाची अपेक्षा केली जाते मात्र सत्‍ताधारी देशमुखाकडून अपेक्षा करणे चुकीचे आहे.

जिल्‍हा बँक निवडणुकीत विरोधकांना उमेदवार मिळणार नाहीत याची काळजी घेवून मतदार याद्या केल्‍या, अधिकारी नियुक्‍त केले तरीही सत्‍ताधाऱ्यांच्‍या विरोधात ४६ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल करून बँकेत करभार चुकीचा होतोय हे सिध्‍द झाले. अधिकाऱ्यांना हाताशी धरून अत्‍यंत चुकीच्‍या पध्‍दतीने विरोधकांचे सर्वच उमेदवारी अर्ज बाद केले आणि मतदारांचा मतदानाचा हक्‍क हीरावून घेण्‍याचे पाप केले. भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष आ. रमेशअप्‍पा कराड यांनी बँकेच्‍या निवडणूकीत सर्व संबंधीताकडे तक्रार करून उमेदवारांचे अपील दाखल करून आज निवडणूक रिंगणात ९ उमेदवार कायम राहीले आणि मतदारांना मतदान करण्‍याचा अ‍धिकार मिळवून दिला. तेव्‍हा लातूर जिल्‍हयातील एकाधिकारधाही संपवून लोकशाही जिवंत ठेवण्‍यासाठी लोकशाही बचाव पॅनलच्‍या सर्वच्‍या सर्व उमेदवारांच्‍या कपबशी या चिन्‍हाला मते देवून बहूमतांनी विजयी करावे असेही आवाहन आ. निलंगेकर यांनी केले.

शेतकऱ्यांना न्‍याय आणि हक्‍क मिळवून देण्‍यासाठी जिल्‍हा बँकेच्‍या निवडणूकीतील लोकशाही बचाव पॅनलच्‍या उमेदवारांना साथ द्यावी असे आवाहन करून भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष आ. रमेशअप्‍पा कराड म्‍हणाले की, जिल्‍हा बँकेत देशमुख आणि देशमुखांचेच चालते तिथे कोणाचेही काही चालत नाही. या बँकेतील एकाधिकारशाही, हूकूमशाही संपवून लोकशाही प्रस्‍थापीत करणे गरजेचे आहे. स्‍वःताला सहकार महर्षी समजणाऱ्या दिलीपराव देशमुख यांना बँकेच्‍या घोषणा करण्‍याचा नैतिक अधिकार काय ? किती शेतकऱ्यांना तीन लाख पाच लाख रूपये बीनव्‍याजी कर्ज दिले हे जाहिर करावे. हा केवळ शेतकऱ्यांना भुलथापा देण्‍याचा प्रकार असल्‍याचे सांगीतले.

मोदींनी शेतकऱ्यांना एफआरपी प्रमाणे भाव देण्‍याचे बंधनकारक केल्‍याने मांजराची बारा गाळपाची येणारी रिकव्‍हरी आता दहा-साडेदहा कशी येवू लागली असे सांगून रमेशअप्‍पा कराड म्‍हणाले की, एफआरपी प्रमाणे गाळप केलेल्‍या ऊसाला भाव घेतल्‍याशिवाय आम्‍ही स्‍वस्‍थ बसणार नाही. लोकशाही बचाव पॅलनचे उमेदवार सर्वसामान्‍य आहेत. त्‍यांच्‍या हाताला धरून काम करून घेता येईल यात शंका करण्‍याचे कारण नाही. तेव्‍हा जिल्‍हा बँकेच्‍या निवडणूकीत भाजपाच्‍या लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी एक एक मत महत्‍वाचे असल्‍याने जागरूक राहून मतदारांशी संपर्क करावा आणि लोकशाही बचाव पॅनल विजयी करण्‍यासाठी मेहनत घ्‍यावी असे आवाहन आ. रमेशअप्‍पा कराड यांनी केले.

About The Author