दयानंद कला महाविद्यालयाची सुरुवात राष्ट्रगीताने

दयानंद कला महाविद्यालयाची सुरुवात राष्ट्रगीताने

लातूर (प्रतिनिधी) : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड ॲकॅडमीक कॅलेंडरनुसार दिवाळी सुट्टीनंतर मंगळवार दि. 16 नोव्हेंबर 2021 पासून महाविद्यालय ऑफलाईन सुरु करण्यात आले आहे. आज प्रथम महाविद्यालयाचा प्रारंभ राष्ट्र गीताने करण्यात आला. यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थी हे बहुतांश 18 वर्षांवरील असून विद्यार्थ्यांचे लसीकरण झाले आहे. अशाच विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश देण्यात आला. महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी दिलेल्या परीपत्रकान्वये कोव्हिड-19 प्रतिबंधात्मक उपाययोजना करून विद्यार्थ्यांकरिता ऑफलाईन पध्दतीने नियमीत वर्ग आजपासून सुरु करण्यात आले आहेत. कोव्हिड-19 च्या व्यवस्थापनाबाबतचे राष्ट्रीय निर्देश, कामांच्या ठिकाणांबाबतचे अतिरिक्त निर्देश, राज्य शासनाने वेळोवेळी काढलेली मार्गदर्शक तत्त्वे किंवा मानक कार्य प्रणाली (एसओपी) तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना लागू करुन तत्त्पुर्वी विद्यार्थी हित लक्षात घेता सर्व वर्गखोल्या निर्जंतुकीकरण करण्यात आल्या आहेत.

दयानंद शिक्षण संस्था अध्यक्ष मा. लक्ष्मीरमणजी लाहोटी, सचिव मा. रमेशजी बियाणी यांनी महाविद्यालय सुरु झाल्याबाबतचा व कोव्हिड19 च्या नियमाचे पालनाबाबतचा आढावा घेतला आहे. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.पी. गायकवाड, सर्व प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी आदी उपस्थित होते.

About The Author