श्यामलाल हायस्कूलमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा !

श्यामलाल हायस्कूलमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा !

उदगीर : येथील श्यामलाल मेमोरियल हायस्कूल मध्ये 26 नोव्हेंबर हा दिन संविधान दिन म्हणून अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार तथा भारतीय संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस श्यामलाल हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री आनंद चोबळे सर तसेच सामाजिक शास्त्र विषयाच्या विभाग प्रमुख श्रीमती मुक्कावार वनमाला यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच श्री देबडवार संजय, कावरे प्रमोद, सूनील बागडे, मलकापूर विक्रम, बोळेगाव दिनेश, सोनाळे बालाजी, हाके नामदेव, उमाकांत सूर्यवंशी तसेच रायवाड मॅडम, हो न्ना मॅडम, इंद्राळे मॅडम, मंदे मॅडम, विद्यार्थी प्रतिनिधी इत्यादींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सहकार्य केले.
आझादी का अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत संविधान दिनाचे औचित्य साधून विविध स्पर्धांचे आयोजन शालेय स्तरावर करण्यात आले. उत्कृष्ट निबंध व पोस्टर निर्मिती, घोषवाक्य इत्यादी साहित्यांचे प्रदर्शन याप्रसंगी करण्यात आले.
संविधान दिनाचे महत्त्व सामाजिक शास्त्र विषयाच्या विभाग प्रमुख श्रीमती मुक्कावार वनमाला यांनी प्रभावी भाषेत सांगितले संविधानाने दिलेल्या स्वातंत्र्य,समता, बंधुता, न्याय या मूल्यांची जोपासना आपण सर्वजण मिळून करूया व महान अशा भारतीय संविधानाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार आपण कार्य करूया असे मत त्यांनी व्यक्त केले त्याचबरोबर माननीय मुख्याध्यापक श्री आनंद चोबळे सर यांनी भारतीय संविधान हा आपल्या देशाचा महान ठेवा आहे एवढ्या मोठ्या लोकशाहीप्रधान देशाचा राज्य कारभार आजही लोकशाही पद्धतीने चालतो हे भारतीय संविधानाचे खूप मोठे यश आहे. हे संविधान व या संविधानातील मानव विकासाची मूल्य, मूलभूत हक्क व कर्तव्य याची जाणीव ठेवून देश हिताचे कार्य आपण सर्वजण मिळून करूया व समृद्ध व बलशाली भारत देश बनवूया असे मत या प्रसंगी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री उमाकांत सूर्यवंशी यांनी केले, भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन व आभार प्रदर्शन सोनाळे बालाजी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.

About The Author