ॲक्विफायर मॅपिंग आणि भुजल विचार विमर्श चर्चासत्र संपन्न

ॲक्विफायर मॅपिंग आणि भुजल विचार विमर्श चर्चासत्र संपन्न

लातूर (प्रतिनिधी) : भारत सरकारच्या केंद्रीय जलसंसाधारण विभाग, मध्यक्षेत्र, नागपूर आणि भुगोल विभाग दयानंद कला महाविद्यालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील ॲक्विफायर मॅपिंग आणि भुजल संबंधित नियोजनासंदर्भात सार्वजनीक विचार विमर्श करण्याकरीता वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. भारत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या वेबिनारमध्ये ग्राऊंड वॉटर सर्व्हे ॲण्ड डेव्हलपमेंट एजन्सीचे विभागीय उपसंचालक श्री. बी.एम. मेश्राम यांनी होळकर शिवाजी महाराज आणि पेशवेकाळातील पारंपारीक जल संधारण याबद्दलची माहिती दिली. त्यांनी सहभागी संशोधकांना जल पुनर्भरण आणि कृत्रिम तंत्रज्ञानाबद्दल प्रोत्साहीत केले. जल पुनर्भरण ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी कशी आहे हे पटवून दिले.

दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पी. गायकवाड हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी दयानंद शिक्षण संस्थेतील जल पुनर्भरण उपक्रमाची माहिती दिली. दयानंद शिक्षण संस्था पूर्वीपासूनच पाण्याचा पूर्नवापर करून संस्थेमधील सर्वच ठिकाणी वृक्षारोपण तसेच बागबगीच्या फुलवलेली आहे. त्यांनी पाण्याच्या पुर्नवापर आणि पाणी बचती संदर्भात सर्वांनीच प्रयत्न करावेत असे प्रतिपादन केले. कार्तीकी पी. डोंगरे, विभाग प्रमुख CGWB, CR नागपूर यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात सहभाग सदस्यांना महाराष्ट्र व भारतातील जल पुनर्भरण उपक्रमाची माहिती दिली. तसेच त्यांनी त्याचे महत्त्व अधोरेखित केले. सिध्दार्थ गायकवाड, भुगर्भशास्त्रज्ञ GSDA लातूर यांनी अतिशय योग्य शब्दात ग्रामीण गावाच्या पाण्याचा ताळेबंद सांगितला. श्रीमती प्रिती राऊत, शास्त्रज्ञ CGWB, CR नागपूर यांनी लातूर जिल्हयातील ॲक्विफायर मॅपिंग आणि भुजल संबंधी नियोजना संदर्भात व्याख्यान दिले. श्री. राहूल शेंडे, शास्त्रज्ञ CGWB, CR नागपूर यांनी प्रास्ताविकात चर्चासत्राचा उद्देश सांगत भूमिका स्पष्ट केली. श्रीमती निलोफर, शास्त्रज्ञ CGWB, CR नागपूर यांनी आभार मानले. या कार्यक्रमास केंद्रातील व राज्यातील अधीकारी, संघटना, शैक्षणिक क्षेत्रातातील मान्यवर, विद्यार्थी आणि इतर सामाजिक संस्थांनी सहभाग नोंदविला.

About The Author