नांदगाव केंद्रशाळेत माझे संविधान माझा अभिमान उपक्रमाची सांगता
बालकांनी जाणून घेतले संविधानातील मूलतत्व
लातूर (प्रतिनिधी) : भारतीय राज्यघटनेतील मूलतत्वांची व्याप्ती आणि सर्वसमावेशकता विद्यार्थ्यांना समजावी तसेच राज्य घटनेतील मूलतत्वे बालकांच्या मनावर कोरली जावित यासाठी संविधानाचा परिपूर्ण परिचय विद्यार्थ्यांना होण्यासाठी शासन स्तरावरून दि. २३ ते २६ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत “माझे संविधान माझा अभिमान” हा उपक्रम राबविण्यात आला.त्याची सांगता संविधान दिनी २६ नोव्हेंबर २०२१ रोजी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा नांदगाव ता.लातूर येथे करण्यात आली.
यासमयी शाळेचे मुख्याध्यापक सोनाजी भंडारे यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन केले.त्यानंतर सामूहिकरित्या संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.पुढे नंतर विद्यार्थ्यांनी संविधानाचे महत्व विषद करणार्या घोषणा दिल्या त्यात विवेक पसरवू जनाजनात – संविधान जागवू मनामनात , संविधानाची कास धरू विषमता नष्ठ करू, संधीची समानता संविधानाची महानता, सबसे प्यारा संविधान हमारा आदी घोषणा देण्यात आल्या.
यानंतर उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांनी भाषण, निबंध, काव्यलेखन, चित्रकला, रांगोळी या प्रकारात आपल्यातील कलाविष्कार सादर केले. या उपक्रमाचे मार्गदर्शन व निरिक्षण शाळेतील उपक्रमशिल शिक्षक नजीऊल्ला शेख यांनी केले तर त्यांना जनाबाई घूले, छाया कांबळे, सुनिता पवार, प्रणिता नवगिरे यांचे सहकार्य लाभले.