दयानंद कला महाविद्यालय भारतीय संविधान उद्देशिकेचे वाचन!

दयानंद कला महाविद्यालय भारतीय संविधान उद्देशिकेचे वाचन!

लातूर (प्रतिनिधी) : 26 नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त दयानंद कला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने उद्देश पत्रिकेचे वाचनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड यांच्या शुभ हस्ते प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून संविधानासही पुष्पहार अर्पण करण्यात आला.

२६ नोव्हेंबर हा दिवस देशभरात संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. कारण २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संसदेत संविधानाला मान्यता देण्यात आली होती. संविधानात नागरिकांच्या मूलभूत हक्क व अधिकाराचा अंतर्भाव आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, राष्ट्रीय एकता व एकात्मता, धर्मनिरपेक्षता, समाजवाद, लोकशाही, गणराज्य प्रस्थायी करायचे आहे.हा संविधानातील निश्चय व निर्धार सर्वांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. सुनीता सांगोले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधानातील उद्देशिकेचे वाचन करत विद्यार्थ्यांकडून पठण करून घेतले.

याप्रसंगी राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संतोष पाटील यांनी २९ऑगस्ट १९४७ पासून मसुदा समितीनं आपल्या कामकाजास सुरुवात केली. जवाहरलाल नेहरू,अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, एन. गोपालस्वामी अय्यंगार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, के. एम. मुन्शी, सय्यद मोहमद सादुल्लाह, बी. एल. मित्तर, डी. पी. खैतान अशा दिग्गज नेत्यांच्या मसुदा समितीने भारतीय संविधानाचा मसुदा तयार केला आहे. हा मसुदा 26नोव्हेंबर 1949 रोजी देशाला ही राज्यघटना प्रदान करण्यात आली. संविधानाची निर्मिती संपूर्ण प्रवास शब्दांकित केला. प्रस्तुत कार्यक्रमास कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक डॉ. दिलीप नागरगोजे, राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख डॉ. सुभाष कदम, कार्यक्रमाधिकारी डॉ. मच्छिंद्र खंडागळे, डॉ. विलास कोमटवाड, कार्यालयीन अधीक्षक श्री नवनाथ भालेराव, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

About The Author