कोरोनाच्या प्रदीर्घ कालावधी नंतर रोकडोबा देवस्थान मंदिर परचंडा महाप्रसादासाठी खुले

कोरोनाच्या प्रदीर्घ कालावधी नंतर रोकडोबा देवस्थान मंदिर परचंडा महाप्रसादासाठी खुले

अहमदपूर ( गोविंद काळे ) : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बंद झालेली मंदिरे उघडण्याचे आदेश राज्य सरकारने दिल्यानंतर आज पासुन (शनिवार, 27 नोव्हेंबर) मंदिरे उघडण्यात आले आहे. अहमदपूर तालुक्यातील परचंडा येथील रोकडोबा मंदिर आज भाविकांच्या दर्शनासाठी व महाप्रसादासाठी खुले करण्यात आले आहे.

अहमदपूर तालुक्यातील परचंडा येथील रोकडोबाच्या दर्शनासाठी दर शनिवारी हजाराहून अधिक भाविक येतात. मात्र कोरोना संसर्गाचा पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने मंदिरं बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार परचंडा येथील रोकडोबा मंदिरही भाविकांसाठी बंद ठेवण्यात आलं होतं
रोकडोबा भक्तांसाठी आनंदाची बातमी, परचंडा येथील रोकडोबा मंदिर शनिवारी पहाटे पाच वाजेपासून उघडण्यात आले आहे
मात्र आता राज्य सरकारच्या आदेशानुसारच परचंडा येथील रोकडोबा मंदिर पहाटे पाच वाजल्यापासून भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. त्यासाठी मंदिर कमीटीने पूर्ण तयारी केली आहे. आज शनिवारी पहाटे पाच वाजता मंदिर खुले करण्यात आले असून नित्य पूजेनंतर भाविकांना दर्शन व महाप्रसाद घेता येणार आहे, अशी माहिती रोकडोबा देवस्थान मंदिर समितीचे अध्यक्ष ह भ प किशन महाराज यांनी दिली आहे.
दरम्यान, राज्य सरकारच्या या निर्णयाने मंदिरावर अवलंबून असणाऱ्या छोट्या-मोठ्या व्यवसायिकांचे मोठे हाल होते. मंदिर बंद असल्यामुळे दुकाने बंद होती. मात्र आता आज शनिवार पासून मंदिरे उघडण्यात येणार असल्यामुळे त्यांचाही रोजीरोटीचा प्रश्न मिटणार आहे.
संस्थान अध्यक्ष ह भ प किशन महाराज, त्र्यंबक भदाडे, ज्ञानोबा कांबळवाड, दिलीप महाराज रोपळेकर, गुणवंत शेरे, संभाजी जाधव, भाऊदास कांबळवाड, माधव शेरे, वामण जाधव, गोविंद जाधव, आशोक कदम, शिवकुमार हिप्परगे, दयानंद तराटे, ज्ञानोबा धनेवाड, भास्कर जाधव, बालाजी शेळके, उद्धव कदम, भगवाण जाधव, आंतराम साखरे, माऊली महाराज, गुरुलींग स्वामी, पदमाकर जाधव, दत्ता कदम, विश्वनाथ जाधव, शाम मुढे, आंगद कोलपुसे, संगम कापसे, हणुमंत जाधव, बालाजी धनेवाड, व समस्त गावकरी मंडळी यांनी माहिती दिली .

About The Author