महिलेच्या गळ्यातील १ लाख ८० हजार रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावली

महिलेच्या गळ्यातील १ लाख ८० हजार रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावली

पुणे (रफिक शेख) : सोनसाखळी चोरट्यांनी हिसकावली. ही घटना मोशी गावठाण येथे घडली. याप्रकरणी मंगल शंकर सस्ते (वय ४९, रा. जुना आळंदी रोड, मोशी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी या त्यांच्या सुनेसोबत मंगळवारी रात्री चालत जात होत्या. रात्री सव्वाआठच्या सुमारास त्या जुना देहू आळंदी रोड – मोशी गावठाण येथे आल्या असता एका दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी मंगल यांच्या गळ्यातील १ लाख ८० हजार रुपये किमतीचे पावणेचार तोळे वजनाचे सोन्याचे गंठण जबरदस्तीने हिसकावून पसार झाले.

About The Author

error: Content is protected !!