Police Flash News

मानसिकदृष्ट्या मजबूत बना; जग जिंकण्याची ताकद तुमच्यातच-

0
6
मानसिकदृष्ट्या मजबूत बना; जग जिंकण्याची ताकद तुमच्यातच-

ॲड. मधू यादव

उदगीर (एल पी उगीले) शारीरिक तंदुरुस्ती महत्त्वाची असली, तरी जीवनातील प्रतिकूल परिस्थितींवर मात करण्यासाठी मानसिकदृष्ट्या सक्षम असणे अधिक गरजेचे आहे. डॉक्टरांचे अंदाज चुकीचे ठरवत हृदयाला छिद्र असतानाही आणि वडिलांचे छत्र हरपल्यानंतरही संघर्ष करत शिक्षण पूर्ण केले. या संघर्षातूनच उभारी घेतली. त्यामुळे परिस्थिती कोणतीही असो, मानसिकदृष्ट्या मजबूत राहिल्यास जग जिंकण्याची ताकद प्रत्येकामध्ये असते, असे प्रतिपादन ॲड. मधू अभिमान यादव यांनी केले.

श्री हावगीस्वामी महाविद्यालयातील राज्यशास्त्र अभ्यास मंडळाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. ए. ए. काळगापुरे होते. यावेळी राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. दत्ताहरी होनराव, प्रा. बालाजी राठोड आणि राज्यशास्त्र अभ्यास मंडळाच्या अध्यक्ष कु. साधना गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

जीवन हा संघर्षाचा प्रवास असून, प्रतिकूल परिस्थितीबद्दल तक्रार करत बसण्यापेक्षा वेळेचे महत्त्व ओळखून शिक्षण पूर्ण करण्याला प्राधान्य दिले पाहिजे, असे यादव यांनी सांगितले. छंदाला करिअरची दिशा देता येते, असा संदेश देताना त्यांनी स्वतःच्या जीवनप्रवासाचे उदाहरण विद्यार्थ्यांसमोर ठेवले. वकिली व्यवसायाबरोबरच ‘प्रोफेशनल मधू’ मेहंदी आणि रांगोळी आर्टिस्ट म्हणूनही ओळख निर्माण केल्याचे त्यांनी सांगितले. त्यांचा खडतर जीवनप्रवास ऐकताना उपस्थित विद्यार्थ्यांचे डोळे पाणावले.

कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीताने झाली. कु. श्रावणी हैबतपुरे, कु. दिशा भालेराव आणि कु. रुपाली शेकापुरे यांनी स्वागतगीत सादर केले. राजेश कसबे आणि ओमकार जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. कु. श्रद्धा भालेराव, कु. दिशा भालेराव, कु. समीक्षा जाधव, स्वप्नील सूर्यवंशी आणि अर्जुन तेलंग यांनी विविध विषयांवर पेपर प्रेझेंटेशन केले.

अध्यक्षीय समारोपात डॉ. ए. ए. काळगापुरे यांनी ॲड. मधू यादव यांच्या संघर्षमय जीवनप्रवासाला सलाम केला. शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रभावी माध्यम असून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालय अशा उपक्रमांसाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. डॉ. विठ्ठल गोरे, प्रा. धनराज बंडे, प्रा. मधूकर मुसने, प्रा. ज्योती संपाचे, प्रा. शिवकुमार उस्तुर्गे, प्रा . विरभद्र बिरादार इत्यादी प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. श्रद्धा मजगे यांनी केले, तर आभार कु. साधना गायकवाड यांनी मानले.

S
WRITTEN BY

Superadmin

Responses (0 )



















Related posts