Police Flash News

उदयगिरी अकॅडमीत ‘प्राइज डे’ उत्साहात संपन्न; गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार!

0
1
उदयगिरी अकॅडमीत ‘प्राइज डे’ उत्साहात संपन्न; गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार!

उदगीर (प्रतिनिधी)

येथील प्रसिद्ध क्लासेस 'उदयगिरी अकॅडमी' मध्ये इयत्ता ५ वी ते ९ वी च्या विद्यार्थ्यांसाठी विशेष बक्षीस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात आणि आनंददायी वातावरणात पार पडला. अकॅडमी मध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात अकॅडमीचे संचालक प्रा. गोपाळकृष्ण घोडके सर यांच्या हस्ते झाली. या कार्यक्रमासाठी इयत्ता ५ वी ते ९ वी चे सर्व विद्यार्थी आकर्षक व सुंदर पोशाखात वेळेवर उपस्थित राहिले होते. विद्यार्थ्यांच्या या शिस्तबद्ध उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवली.

अकॅडमीमध्ये घेण्यात आलेल्या विविध परीक्षा, स्पर्धा आणि शैक्षणिक उपक्रमांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरवण्यात आले. बक्षीस मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि अभिमान स्पष्ट दिसत होता.

या प्रसंगी बोलताना उदयगिरी अकॅडमी चे संचालक प्रा. गोपाळकृष्ण घोडके सर यांनी सांगितले की, "विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची आवड निर्माण व्हावी, त्यांना प्रोत्साहन मिळावे, त्यांच्यातील गुणांना वाव मिळावा आणि त्यांचा आत्मविश्वास वाढावा या उद्देशाने या बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे." तसेच त्यांनी - प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ बक्षीस मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना पुढील अभ्यासासाठी शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रा. संतोष पाटील, प्रा. डॉ. धनंजय पाटील, प्रा. ज्योती खिंडे, प्रा. श्रीगण रेड्डी, प्रा. गोविंद केंद्रे, प्रा. नंदिनी निटूरे, प्रा. निवेदिता भंडारे आदी उपस्थित होते.

S
WRITTEN BY

Superadmin

Responses (0 )

    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌

Related posts