Police Flash News

भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम जयंती निमित्त वाचन प्रेरणा व व्हाईट केन सेफ्टी दिन साजरा

0
1
भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम जयंती निमित्त वाचन प्रेरणा व व्हाईट केन सेफ्टी दिन साजरा

उदगीर (प्रतिनिधी) भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त वाचन प्रेरणा दिन व व्हाईट केन सेफ्टी डे निमित्त महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, लुई ब्रेल व हेलन केलर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश तोंडारे, सचिव डॉ. रामप्रसाद लखोटिया, प्राचार्य डॉ. आर. के. मस्के उपस्थित होते, ग्रंथालय विभागातर्फे सलग आठ तास वाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी सुप्रसिद्ध साहित्यिक फ.म. शहाजिंदे यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली, प्रा. डॉ. दीपक चिद्दरवार, प्रा. डॉ. बी.आर. दहिफळे आणि प्रा. प्रवीण जाहूरे यांनी मुलाखत घेतली व उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना प्रा. शहाजिंदे यांनी उत्तरे दिली, मुलाखती दरम्यान त्यांनी बालपण, साहित्यिक सेवा, शैक्षणिक अनुभव, आयुष्यातील चांगल्या व वाईट अनुभवांची शिदोरी उलगडली व स्वलिखित कवितेचे सादरीकरण केले, यावेळी राजेंद्र चव्हाण यांनी जागतिक पांढरी काठी दिनानिमित्त अंध व्यक्तीच्या आयुष्यात पांढऱ्या काठीचे महत्त्व याविषयी माहिती दिली, अध्यक्षीय समारोप बसवराज पाटील नागराळकर यांनी केला, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शिवहार स्वामी यांनी केले तर आभार ग्रंथपाल डॉ. लक्ष्मीकांत पेन्सलवार यांनी मानले.

S
WRITTEN BY

Superadmin

Responses (0 )

    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌

Related posts