उदगीर (एल पी उगीले) तालुक्यातील एकुर्का रोड येथील समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुलांचे दोन्ही संघ तालुकास्तरीय व्हॅालिबॅाल स्पर्धेत प्रथम आले आहेत. १४ व १९ वर्षे वयोगटातील हे दोन्ही संघ जिल्हास्तरावर खेळणार आहेत.
उदगीर येथील कै. बापूसाहेब पाटील एकंबेकर महाविद्यालयाच्या मैदानावर रविवारी पार पडलेल्या जिल्हास्तरीय व्हॅालिबॅाल स्पर्धेत १४ वर्षे वयोगटात खेळताना वाढवणा बु. जि. प. मुंलाच्या संघाचा दोन सरळ सेट मध्ये पराभव करून जिल्हास्तरीय स्पर्धेत पात्र ठरला आहे. तर १९ वर्षे वयोगटात उदगीर च्या जयहिंद पब्लिक स्कुल च्या मुलांच्या संघाचा ही दोन सरळ सेट मध्ये पराभव करत जिल्हास्तरावर मजल मारली आहे. या यशाबद्दल दोन्ही संघांतील खेळाडू व क्रिडा समन्वयक किरण हाळीघोंगडे यांचे संस्थासचिव प्राचार्य प्रमोद चौधरी, पर्यवेक्षक सिद्धार्थ बोडके, सहसचिव प्रणयन चौधरी, संस्थासदस्य प्रा. एम. व्ही. स्वामी, प्रयास चौधरी, प्रा. बी. एस. बाबळसुरे, रसूल पठाण, यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.












Responses (0 )