Police Flash News

शालेय बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेत समर्थच्या मुलींचा संघ राज्यस्तरावर.

0
16
शालेय बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेत समर्थच्या मुलींचा संघ राज्यस्तरावर.

उदगीर (एल पी उगीले) तालुक्यातील एकुर्का रोड येथील समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातीचा १९ वर्षाखालील मुलींचा संघ विभागीय बॅडमिंटन स्पर्धेत प्रथम आला असून हा संघ राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत खेळणार आहे.

धाराशिव येथील श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम येथे सोमवारी खेळविण्यात आलेल्या विभागीय बॅडमिंटन स्पर्धेत समर्थ च्या मुलींचा संघ प्रथम आला आहे. या संघात गौरी खर्डेकर, मृणाल नितीन पोतदार, सिद्धी गावंडे, संध्या बोडके, मंजुषा घायाळ या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला आहे. या यशाबद्दल खेळाडू व क्रीडा समन्वयक किरण हाळीघोंगडे यांचे संस्था सचिव प्राचार्य प्रमोद चौधरी, पर्यवेक्षक सिध्दार्थ बोडके, सहसचिव प्रणयन चौधरी, संस्था सदस्य प्रा. एम. व्ही. स्वामी, बी. एस. बाबळसुरे, प्रयास चौधरी, रसूल पठाण यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

S
WRITTEN BY

Superadmin

Responses (0 )

    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌

Related posts