उदगीर (अरुण उजेडकर) अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा चे आयोजन उदगीर येथे करण्यात आले आहे दिनांक 25 ऑक्टोबर 2026 रोजी रविवारी सकाळी 11 वाजता हा महामोर्चा सुरू होणार आहे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि सर्वसामान्यांची अस्मिता असलेले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून छत्रपती शिवाजी महाराज चौक या मुख्य रस्त्यावरून हा महामोर्चा निघणार आहे. या महामोर्चा मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन अनुसूचित जाती वर्गीकरण विरोधी महामोर्चा संयोजन समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे.
उदगीर येथील हा महामोर्चा ऐतिहासिक ठरणार अशी अपेक्षा या महामोर्चातील संयोजकापैकी एक भागवत तलवारे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. हा महामोर्चा ऐतिहासिक ठरवण्यासाठी सर्व समाज बांधवांनी एकजुटीने एकत्र येऊन सहभाग घ्यावा आणि उदगीर चे नाव महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात गाजले पाहिजे अशा पद्धतीने हा मोर्चा यशस्वी करावा असेही आवाहन भागवत तलवारे व त्यांच्या मित्र परिवारांनी केले आहे.














Responses (0 )