‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण:2020 प्रभावी अंमलबजवणीवर एक दिवशीय कार्यशाळा संपन्न

‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण:2020 प्रभावी अंमलबजवणीवर एक दिवशीय कार्यशाळा संपन्न

लातूर (प्रतिनिधी) : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 – प्रभावी अंमलबजावणी या विषयावर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड व दयानंद कला महाविद्यालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने लातूर जिल्हा स्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथील मानव्यविद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ अजय टेंगसे यांनी असे प्रतिपादन केले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण : 2020 नुसार पदवी शिक्षण 3 किंवा 4 वर्षांचे असू शकते, याअभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना एकाच महाविद्यालयात विविध अभ्यासक्रम अध्यापनाची संधी प्राप्त होणार असून विद्यार्थ्यांना आपल्या आवडी प्रमाणे शिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे. तसेच 1 वर्षा नंतर प्रमाणपत्र, 2 वर्षानंतर प्रगत पदविका, 3 वर्षांनंतर बॅचलर डिग्री आणि 4 वर्षानंतर बॅचलरविथ ऑनर्स अशा पध्दतीने पदवी, पदव्युत्तर पदवी आणि संशोधन असे एकत्रित अध्ययन या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 प्राप्त होईल असे प्रतिपादन या वेळी केले. तसेच पुढे ते असे म्हणाले की, वेगवेगळ्या उच्च शिक्षण संस्थांकडून मिळवलेल्या शैक्षणिक उपलब्धी ही डिजिटल लॉकरमध्ये संग्रहित करण्यासाठी अकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिट ची स्थापना केली जाईल. तसेच अद्यावत माहिती हस्तांतरित करता येईल आणि अंतिम पदवी मिळवल्यावर त्याची गणना केली जाईल. तसेच सर्व भारतीय भाषांचे संवर्धन, त्यांचा प्रसार व्हावा तसेच त्यांच्यामध्ये एक प्रकारे चैतन्य निर्माण व्हावे याची सुनिश्चिती करून उच्च शिक्षण संस्थांमध्ये अधिकाधिक मातृभाषेचा किंवा स्थानिक भाषेचा उपयोग शिकवण्याचे माध्यम म्हणून केला जाईल व भारतीय उच्च शिक्षण आयोगाची (HECI) स्थापना करण्यात येईल. असे या प्रसंगी मा.डॉ. अजय टेंगसे यांनी प्रतिपादन केले.

या कार्यक्रमाचे आयोजन दयानंद शिक्षण संस्थेच्या सभागृहात करण्यात आले. या कार्यशाळेसाठी महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण मंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील, महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव श्री. विकासचंद्र रस्तोगी, उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने , स्वा.रा.ती.म. विद्यापीठ, नांदेडचे, कुलगुरु डॉ. उध्दव भोसले, प्र.कुलगुरु डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन आणि विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे यांनी आभासी पध्दतीने मार्गदर्शन केले.

लातूर जिल्हा कार्यशाळेसाठी संपूर्ण जिल्ह्यातील सुमारे 1150 प्राध्यापक प्रत्यक्ष उपस्थित होते. या कार्यशाळेच्या व्यासपीठावर मा. डॉ. अजय टेंगसे, मा. डॉ. राजेश शिंदे, दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, उप्रप्राचार्य डॉ. प्रशांत मान्नीकर, दयानंद वाणिज्य महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.राजाराम पवार, विधी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. जी. लक्ष्मण, दयानंद फार्मसी महाविद्यलयाच्या प्राचार्या डॉ. क्रांती सातपुते, कार्यक्रमाचे संयोजक तथा समन्वयक डॉ. संतोष पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यशाळेचे सूत्रसंचलन डॉ. सुनिता सांगोले आणि प्रा. स्फूर्ती समुद्रे यांनी केले तर मान्यवरांचे आणि उपस्थितांचे आभार समन्वयक डॉ. संतोष पाटील यांनी मानले.

About The Author