श्री हावगीस्वामीतील लोकप्रशासन विभागाच्या विद्यार्थ्यांची लातूर प्रशासकीय कार्यालयास अभ्यास भेट

श्री हावगीस्वामीतील लोकप्रशासन विभागाच्या विद्यार्थ्यांची लातूर प्रशासकीय कार्यालयास अभ्यास भेट

उदगीर (एल.पी.उगीले) : श्री हावगीस्वामी महाविद्यालयातील लोकप्रशासन विभागाच्या वतीने लातूर प्रशासकीय कार्यालय अभ्यास भेट संयोजक व लोकप्रशासन विभाग प्रमुख डॉ. उलगडे लक्ष्मण यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले.या अभ्यास भेटीत लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, लातूर, जिल्हाधिकारी कार्यालयास लोकप्रशासन विषयाच्या विद्यार्थ्यांनी अभ्यास भेट दिली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी लोकप्रशासन विषयाच्या विद्यार्थ्यांना जिल्हा पोलीस प्रशासन यंत्रणा, रचना व कार्य, कायदा व सुव्यवस्था, प्रभावी नियंत्रण प्रणाली, भूमिका संदर्भात सखोल माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी कशाप्रकारे करावी, यु. पी. एस. सी. पूर्व, मुख्य परीक्षा तसेच मुलाखत (सेवानिवृत्त प्रशासकीय तज्ज्ञ समिती ) मार्फत विचारले जाणारे प्रश्न व त्याचे सारांश स्वरूपात उत्तरे मांडण्याचे कौश्यल्य , दररोज किमान बारा तास अभ्यास त्यासाठी अनेक संदर्भ ग्रंथ वाचन, चिंतन व लिखाण, नव – नवीन घटना घडामोडी, ऐतिहासिक माहिती, कठोर परिश्रम, योग्य नियोजन करणे आवश्यक आहे, असे सांगितले.

त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभागातील नायब तहसीलदार हरीश काळे यांनी विद्यार्थ्यांना लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाची प्रशासकीय रचना व विविध विभाग, उपविभाग आणि कार्य, उपक्रम, वेबसाईट, प्रकल्प आराखडा, निवडणूक नाव नोंदणी व दुरुस्ती अँप, केंद्र व राज्य शासनाच्या योजना आदींची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी बी.ए. पदवी बरोबरच इतरही अनेक स्पर्धा परीक्षेची पूर्व तयारी केली पाहिजे, वर्तमानपत्रे, youtube स्पर्धात्मक मार्गदर्शन series, प्राथमिक ते उच्च माध्यमिक स्तरावरील सर्व पाठ्यापुस्तके आदींचे सखोल वाचन,एम .पी. एस.सी.पूर्व परीक्षा , मुख्य परीक्षा व मुलाखत तयारीसाठी सखोल अभ्यास असणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले.

यावेळी दयानंद कला महाविद्यालयातील मराठवाड्यातील प्रचलित सुसज्ज ग्रंथालयास, ग्रंथालयातील जोशी व इतर कर्मचारी वर्गांसोबत चर्चा, जुने साप्ताहिक, ग्रंथ पाहणी करण्यात आले.यावेळी ग्रंथालयाच्या वतीने सर्वाना वेध विशेषांक भेट देण्यात आले.अभ्यास भेट कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रमुख संयोजक व करिअर कट्टा चे समन्वयक डॉ. लक्ष्मण उलगडे, सह समन्वयक प्रा. ज्योती संपाळे, सह संयोजक डॉ. शिवाजी राठोड यांनी परिश्रम घेतले.या अभ्यास भेटीत लोकप्रशासन विषयाच्या बी. ए. प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षाचे विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठया संख्येने उपस्थित होते.सदरील प्रशासकीय कार्यालय अभ्यास भेट महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एस. एन. शिंदे व उपप्राचार्य डॉ. ए. ए. काळगापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रेरणेने आयोजित करण्यात आले. मागील बारा वर्षांपासून अविरत लोकप्रशासन विभागाच्या वतीने अभ्यासक्रम व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने विद्यार्थी केंद्रित प्रशासकीय, शैक्षणिक, ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक अभ्यास सहल भेट, उपक्रम राबविण्यात आलेले आहेत.

About The Author