लाल बहादूर शास्त्री प्राथमिक शाळेतील मोरखंडे बंधूचे मेट्रो ब्रेन अबॅकस स्पर्धेत यश

उदगीर (एल.पी.उगीले) : नांदेड येथे झालेल्या मेट्रो ब्रेन अबॅकस इंटरनॅशनल कॉम्पिटेशनमध्ये लेवल (C) च्या स्पर्धेत येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई संचलित लालबहादुर शास्त्री प्राथमिक शाळेतील जुळे बंधू चि.सिध्दांत नवनाथ मोरखंडे याने प्रथम तर, वेदांत नवनाथ मोरखंडे याने तृतीय क्रमांक मिळवून यश संपादन केले.

लाल बहादूर शास्त्री प्राथमिक शाळेतील मोरखंडे बंधूचे मेट्रो ब्रेन अबॅकस स्पर्धेत यश

या यशा बद्दल भा.शि.प्र.संस्थेचे अध्यक्ष डॉ सुरेंद्र आलूरकर, कार्यवाह डॉ हेमंतजी वैद्य, स्थानिक समन्वय समिती अध्यक्ष मधुकर वटृट्मवार, स्थानिक समन्वय समिती कार्यवाह तथा भा.शि.प्र.संस्थेचे केंद्रीय सदस्य शंकरराव लासुणे, शालेय समिती अध्यक्ष व्यंकटराव गुरमे, मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे व सर्व शिक्षक, कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

About The Author

error: Content is protected !!