एक मे रोजी कामगार मेळावा

उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर परिसरातील कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी, महाराष्ट्र शेतकरी व बांधकाम मजूर संघटना यांच्या वतीने भव्य कामगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. कामगारांच्या न्याय हक्कासाठी गेल्या सहा वर्षापासून अविरत संघर्ष करणाऱ्या आणि कामगारांच्या कल्याणासाठी धडपडणाऱ्या महाराष्ट्र शेतकरी व बांधकाम मजूर संघटना यांच्या वतीने महाराष्ट्र दिन तथा कामगार दिनानिमित्त मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्याच्या निमित्ताने कामगारांच्या विविध मागण्यांसाठी आवाज उठवायचा आहे. त्यासाठी जास्तीत जास्त कामगारांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

या मेळाव्यासाठी उद्घाटक म्हणून उदगीरचे आमदार संजय बनसोडे, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून खासदार सुधाकररावजी शृंगारे, मुख्य मार्गदर्शक म्हणून कामगार आयुक्त मंगेशजी रामराव झोले हे राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थितीमध्ये माजी आमदार सुधाकर भालेराव, ज्येष्ठ समाजवादी नेते तथा कामगारांचे नेते रंगा राचुरे, माजी नगराध्यक्ष बसवराज बागबंदे, माजी आमदार गोविंदराव केंद्रे, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, शिवसेनेचे जिल्हा संघटक विधीज्ञ गुलाब पटवारी, वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष चंदर आण्णा वैजापूरे, माजी आमदार मनोहर पटवारी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे, उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सिद्धेश्वर उर्फ मुन्ना पाटील, उदगीर विभागाचे अधिकारी प्रवीण मेंगशेट्टि, तहसीलदार रामेश्वर गोरे, मुख्याधिकारी शुभम क्यातामवर, गटविकास अधिकारी महेश सुळे, ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक अरविंद पवार यांच्यासह शिवसेनेचे तालुकाप्रमुख कैलास पाटील, राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे निवृत्ती सांगवे, प्रीती चंद्रशेखर भोसले, शिवाजीराव गुरुडे इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या मेळाव्यात प्रामुख्याने नोंदणीकृत बांधकाम कामगारांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा, बांधकाम कामगारांना स्वतःची जागा नसल्यास शासकीय जागेवर म्हाडा अंतर्गत घरकुल बांधून द्यावे, बांधकाम कामगारांची अपघात विम्यात वाढ करून दहा लाख रुपये करावे, उदगीर शहरात कामगार भवन उभारण्यात यावे, बांधकाम कामगारांच्या सांस्कृतिक व विवाह इतर कार्यक्रमासाठी मंगल कार्यालय उभारण्यात यावे, नोंदणी नसलेल्या बांधकाम कामगारांना कामगार अपघात व दुखापत झाल्यास पंचनामा करून त्याची कामगार नोंदणी करून त्यांना योजनेचा लाभ मिळवून द्यावा. साठ वर्षांपुढील बांधकाम कामगारांना पेन्शन योजना लागू करावी, बांधकाम कामगारांना दिले जाणारे पाच हजार रुपये बंद झालेले अनुदान पुन्हा चालू करावे, बांधकाम कामगारांच्या कुटुंबाला संसार उपयोगी साहित्य तात्काळ उपलब्ध करून द्यावे, मध्यान भोजन सकाळ व संध्याकाळ दोन वेळेस देण्यात यावे, बांधकाम कामगारांच्या मुलीच्या लग्नासाठी 51 हजार रुपये असलेल्या योजनेची वाढ करून एक लाख 11 हजार इतकी रक्कम करावी. यासह विविध मागण्या मांडल्या जाणार आहेत. त्यासाठी जास्तीत जास्त कामगारांनी या मेळाव्यासाठी उपस्थित राहावे. असे आवाहन शुभम कावर, धनराज भोसले, अक्षय सकट, संजय राठोड, संजय वाघे, नारायण भालेराव, अंकुश केंद्रे, चंद्रकांत कावर, विवेकानंद खिंडे ,विजयकुमार मुळे, सुनील मादळे, विजय भालेराव, नागनाथ कावर यांनी केले आहे.

About The Author