‘पुनरुत्थान समरसता गुरुकुलम’ च्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक व गरजू वस्तूचे वाटप
अहमदपूर ( गोविंद काळे ) : – पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनीयरिंग (पीसीसीओई)
कंप्यूटर इंजिनिअरिंग डिपार्टमेंटच्या दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांनी चिंचवड येथील ‘पुनरुत्थान समरसता गुरुकुलम’ च्या चारशे विद्यार्थ्यांना शैक्षणिक व गरजू वस्तूचे वाटप केले.
याविषयीची अधिक माहिती अशी की, ‘पुनरुत्थान समरसता गुरुकुलम’ हा वंचित घटकातील मुलांसाठी असणारा हा एक निवासी शैक्षणिक प्रकल्प असुन या शैक्षणिक प्रकल्पामध्ये पारधी, भिल्ल, वडार, कैकाडी, कोल्हाटी, डोंबारी, लमान, घिसाडी, अशा वंचित घटकातील मुलांसाठी निवासी गुरुकुल चालविले जाते. पहिली ते बारावी पर्यंतच्या नेहमीच्या अशा शिक्षणाबरोबरच पारंपारिक कला कौशल्यावर आधारित आधुनिक बारावी पर्यंतच्या शिक्षणाचा मेळ यात घातला आहे. मुलांना शालेय शिक्षणाबरोबरच मुलांच्या अंगभूत कला-कौशल्याला वाव देण्यासाठी त्यांना पहिली पासूनच अभियांत्रिकी (वेल्डिंग, प्लंबिंग, बांधकाम, सुतारकाम), धातुकाम ,बांबूकाम,लाकडावरील कोरीवकाम , दगडातील कोरीवकाम,आयुर्वेद ,कृषि-गो-ज्ञान, गायन वादन, पॉटरी, शिल्पकला, गृहविज्ञान, संगणक, शिक्षणशास्त्र इ.चे शिक्षणही दिले जाते. धातुकाम ,मूर्तीकाम ,बांबूकाम ,संगणक ,संगीत , कृषि-गो-विज्ञान ,भाषाविज्ञान ,सामाजविज्ञान ,मैत्र ,आयुर्वेद ,शिक्षणशास्त्र असे अनेक विषय शिकवले जातात . आज या ठिकाणी ४०० च्या वर मुले, मुली शिकत असून या विद्यार्थ्यांना पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनीयरिंग (PCCOE)
कंप्यूटर इंजिनिअरिंग डिपार्टमेंटच्या दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांनी चिंचवड येथील ‘पुनरुत्थान समरसता गुरुकुलम’ च्या चारशे विद्यार्थ्यांना शैक्षणिक व गरजू वस्तूचे वाटप करण्यात आले. यामध्ये साबन, पेन्सिल, पेन सह अनेक गरजू वस्तूंचे वाटप करण्यात आले. या वाटपाच्या उपक्रमात
एनएसएससेलचे मार्गदर्शक प्रा.आनंद बिराजदार, चैतन्य क्षिरसागर, ओंकार कुलकर्णी, रुद्राक्ष जेजुरीकर, अपूर्वा खाजबागे आदींच्या सहकार्याने वाटप करण्यात आले.