मौजे डिग्रस येथे दोन रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याचा शुभारंभ

मौजे डिग्रस येथे दोन रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याचा शुभारंभ

उदगीर (एल.पी.उगीले) : लातूर जिल्हाचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्या आदेशाने व संपर्क अधिकारी डॉ अरविंद लोखंडे यांच्या सुक्ष्म नियोजनातून उदगीर तालुक्यातील अतिक्रमण मुक्त रस्ते करण्याची मोहीम प्रविण मेंगशेट्टी उपविभागीय अधिकारी उदगीर यांच्या मार्गदर्शनाखाली, रामेश्वर गोरे तहसीलदार यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण मुक्तीने जोर पकडला आहे. हेर मंडळविभाग अंतर्गत येणाऱ्या डिग्रस गांवात मंडळ अधिकारी पंडित जाधव व तलाठी अनुराधा अलगुले, भुमी अभिलेख प्रतिनिधी शितल शिंदे यांनी दोन रस्ते अतिक्रमण मुक्त करण्याचे नियोजन केले. त्यानुसार उदगीरचे तहसीलदार रामेश्वर गोरे यांच्या हस्ते नारळ फोडून सुरुवात करण्यात आली. प्रथम डिग्रस – रोहीणा पाणंद रस्ता, दुसरा रस्ता गणेशवाडी, डिग्रस गांवापासुन डिग्रस – कबनसांगवी शिवपर्यंत हे दोन रस्ते खुले करण्याचा कार्यक्रमाचे शेतकरी यांनी लोकसहभागातून निधी जमा करून जे सहभाग नोंदविले ते शेतकरी श्रीकांत कोंपले, राजेंद्र मरलापल्ले, अशोक मरलापल्ले, नरसिंग मरलापल्ले , बाबु मरलापल्ले, देविदास डोंबाळे, भिमराव डोंबाळे, मारोती डोंबाळे, बालाजी बोईनवाड, शांतीनाथ भुईनवाड, सचिन पुट्टेवाड, निवृती दंडीमे, प्रकाश ढगे, गुलाब शेख, परमेश्वर मोरे, दत्ता जाधव, ज्ञानोबा दंडीमे , बंदेअली शेख, माधव मरेवाड, ईत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळ अधिकारी पंडित जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन तलाठी अनुराधा अलगुले यांनी केले.

About The Author