बाजार समितीची निवडणूक ही गडीवरची हुकुमशाही व घराणेशाही संपवुन बळीराजाचे राज्य आणण्यासाठी

बाजार समितीची निवडणूक ही गडीवरची हुकुमशाही व घराणेशाही संपवुन बळीराजाचे राज्य आणण्यासाठी

लातूर (प्रतिनिधी) : लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ही शेतकऱ्यांना न्याय देण्यारी असली पाहिजे. कॉग्रेसने ३०-४० वर्षे बाजार समितीची सत्ता भोगुन सुद्धा कॉग्रेस शेतकऱ्यांना बाजार समितीमध्ये अत्यावश्यक सेवा सुद्धा देऊ शकली नाही. बाजार समितीचा सभापती हा शेतकरी असे अपेक्षित असताना सुद्धा त्या ठिकाणी एक प्रसिद्ध व्यापारी शेतकरी म्हणून बसवून बाजार समितीच्या काळा इतिहास लिहिण्याचे काम कॉग्रेसने केले आहे. शेतकरी ज्या वेळेस सभापती केले त्यावेळेस वर्षाला नविन सभापतीची निवड व्हायची. व्यापारी सभापती म्हणून बसविला आणि तोही सहा वर्षे हे कसले शेतकरी हीत. कॉग्रेसला त्यांच्या चिन्हाप्रमाणे मान हलवणारे नंदीबैल पाहिजे असतात. त्यांच्या बरोबरच बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये भाजप ही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून कॉग्रेसमधल्या आयात उमेदवारांना उमेदवारी देऊन परत तिच चुक करत आहे. शिवसेना ही निवडणूक बळीराजाचे राज्य आणण्यासाठी, घराणेशाही, हुकुमशाही संपविण्यासाठी लढवित आहे. शिवसेना पुरस्कृत बळीराजा पॅनलने शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठी शेतकऱ्यांसाठी विविध आंदोलने केलेले, शेतीच करत असलेले शेतकरी, कष्टकरी उमेदवार दिले आहेत. या उमेदवारांना शेतकऱ्यांनी त्यांचे नेतृत्व करण्याची संधी दिल्यास ते शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवतील. याची मला खात्री आहे. बळीराजा कृषी विकास पॅनलला मतदान म्हणजे शेतकऱ्यांच्या हिताला मतदान असे मत जिल्हाप्रमुख ॲड. बळवंतभाऊ जाधव साहेब यांनी व्यक्त केले. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख कुलदीप सुर्यवंशी, तालुकाप्रमुख राजकुमार सुरवसे, प्रकाश पाटील वांजरखेडकर, बळीराजा कृषी विकास पॅनलचे उमेदवार विजय जाधव, सुधिर काटे, सदाशिव गव्हाणे, बालकिशन आडसुळ, इंगळे नरसिंग, कलमे राजकुमार, काळे बाळासाहेब, पटेल बाबर, रणखांब व्यंकटराव, वाघमोडे विजयकुमार, देशमुख अंजली, वाघमोडे मंदाकिनी, कुंभार अंकुश, बलदवा भवरीलाल आदी सर्व उपस्थित होते.

About The Author