उदगीर वकील कक्षासाठी निधी मंजूर, लवकरच कामास सुरुवात

उदगीर वकील कक्षासाठी निधी मंजूर, लवकरच कामास सुरुवात

उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर वकील कक्षासाठी आ.संजय बनसोडे यांच्या निधी मधून १ कोटी रूपयाचा निधी मंजूर झाला असून याचे काम या आठवड्यात चालू करण्यात येईल अशी माहिती आ.संजय बनसोडे यांनी वकिल संघाच्या चमुला दिली. वकील संघाचे अध्यक्ष विधीज्ञ बाळासाहेब नवटक्के,उपाध्यक्ष विधीज्ञ विष्णु लांडगे,सचिव विधीज्ञ सचिन हुडगे,सह सचिव विधीज्ञ हाशमी अ.हाजी, कोषाध्यक्ष विधीज्ञ ज्ञानोबा सोमवाड,ग्रंथालय सचिव नामदेव पांचाळ,जेष्ठ विधीज्ञ एस.टी.पाटिल,विधीज्ञ मध्वरे,विधीज्ञ प्रमोद बिरादार या चमुने बुधवारी दुपारी विश्राम गृहावर जाऊन आ.संजय बनसोडे यांची भेट घेतली, तेंव्हा आ.संजय बनसोडे यांनी वकिल कक्षासाठी निधी मंजूर झाला असून त्या ईमारतीच्या बांधकामास या आठवड्यात सुरू करायचे आहे असे सांगितले.त्यानुसार सायंकाळी ५ वाजता प्रत्यक्ष न्यायालय परिसरात येऊन पहाणी केली.

तसेच या प्रसंगी या न्यायालयात विद्युत सुरळीत होण्यासाठी एक्सप्रेस फिडरची मागणी जेष्ठ विधीज्ञ एस.टी.पाटिल यांनी आ.संजय बनसोडे यांच्या कडे केली. आ.संजय बनसोडे यांनी लगेचच विद्युत वितरण कंपनीला संपर्क करून त्याला लागणारा निधी सुध्दा तात्काळ मंजूर करण्याचे पत्रही दिले.यामुळे न्यायालयात २४ तास विज रहाणार.न्यायालयाच्या या दोन मागण्या मान्य केल्या बद्दल सर्व वकिला तर्फे कौतुक केले जात आहे.

About The Author