उदगीर तालुक्यात अवकाळीचा तडाखा, वादळी वाऱ्यासह गारपीट, विजांचा कडकडाट, वृक्ष ही कोलमडले!

उदगीर तालुक्यात अवकाळीचा तडाखा, वादळी वाऱ्यासह गारपीट, विजांचा कडकडाट, वृक्ष ही कोलमडले!

उदगीर (एल. पी. उगीले) : उदगीर तालुक्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना चांगलाच आर्थिक फटका बसला आहे. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे आंबा आणि द्राक्ष या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. विजांचा गडगडाटही मोठ्या प्रमाणात चालू होता. वादळी पावसामुळे शहरासह ग्रामीण भागातील अनेक वृक्ष कोलमडून पडली आहेत. या वादळ वाऱ्यामुळे विद्युत मंडळाचे ही मोठे नुकसान झाल्याने अनेक ठिकाणी तांत्रिक बिघाड निर्माण झाला आहे, परिणामतः शहरातील अनेक भागातून विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. ग्रामीण भागातील कित्येक झोपडपट्टी भागातील घरांचे नुकसान झाले आहे. अनेक घरावरील पत्रे उडून गेली आहेत. उदगीर शहराचे उपनगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोमनाथपूर येथे कित्येक वर्षापासून उभ्या असलेल्या मोठ्या वृक्षाने अखेरचा श्वास घेत एका घराचे मोठे नुकसान केले आहे. उदगीर आडत बाजारात अचानक आलेल्या या पावसामुळे व्यापाऱ्यांनी दुकानाबाहेर लावलेल्या मालाच्या थप्पी मुळे अनेक पोते भिजले आहेत. त्यामुळे तो माझ्या शेतकऱ्यांचा होता त्यांनाही चांगलाच फटका बसणार आहेत.

महाराष्ट्र शासनाने सतत झालेल्या अतिवृष्टीनेच शेतकऱ्याचे नुकसान झाले तर नुकसान भरपाई देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे अशा अवकाळी पावसात झालेल्या मोठ्या नुकसानीतून शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ कोण देणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. जे छोटे छोटे बागायतदार होते, त्यांचे तर पूर्ण कंबरडेच मोडले आहे. त्यामुळे याही नुकसानीचे पंचनामे केले जावेत, आणि ज्यांचा उदरनिर्वाह आंबा आणि द्राक्षावरच अवलंबून होता. अशांना अर्थसहाय्य केले जावे. तसेच ज्या गरिबांच्या घरांना या वादळामुळे काही ठिकाणी तडे गेले आहेत, तर काहींचे पत्रे उडून गेले आहेत. त्याचेही पंचनामे केले जावेत, अशी मागणी होत आहे.

About The Author