लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीतकृषी विकास पॅनलचा दणदणीत एकतर्फी विजय

कृषी विकास पॅनलच्या नंदीचा वारू चौफेर उधळला शेतकरी विकास पॅनलचा धुव्वा

लातूर (प्रतिनिधी) : लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीत कृषि विकास पॅनलचे सर्वच्या सर्व १८ उमेदवार मोठया मताधिक्कयांने विजयी झाले आहेत. या निवडणूकीत कृषि विकास पॅनलच्या सकारात्मक प्रचाराने  शेतकरी विकास पॅनलच्या वतीने राबवण्यात आलेले अफवा तंत्र आणि नकारात्मक प्रचाराला धोबीपछाड केले आहे.

लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीतील कृषि विकास पॅनलचे   सोसायटी सर्वसाधारण मतदार संघात जगदीश जगजीवनराव बावणे, श्रीनिवास श्रीराम शेळके, लक्ष्मण रामकृष्ण पाटील, युवराज मोहनराव जाधव, आनंद रामराव पाटील, आनंद धोंडीराम पवार, तुकाराम ग्यानदेव गोडसे, महिला मतदार संघात सुरेखा बळवंत पाटील, लतिका सुभाष देशमुख, इमाव मतदार संघात सुनिल नामदेवराव पडीले, विमुक्त जाती भटक्या जमाती मतदार संघात सुभाष दशरथ घोडके, ग्रामपंचायत मतदार संघात अनिल सुभाष पाटील, शिवाजी किसनराव देशमुख, अनुसुचीत जाती मतदार संघात बालाजी हरिश्चंद्र वाघमारे, आर्थिकदृष्टया दुर्बल घटक मतदार संघात सचिन विष्णु सुर्यवंशी, व्यापारी मतदार संघ बालाप्रसाद बन्सीलाल बिदादा, सुधीर हरिश्चंद्र गोजमगुंडे, हमाल व तोलारी मतदार संघात शिवाजी दौलतराव कांबळे विजयी झाले आहेत.

लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीतकृषी विकास पॅनलचा दणदणीत एकतर्फी विजय

कृषि विकास पॅनलने ही निवडणूक केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांचे आशीर्वाद घेऊन लढवली. माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख व लातूर ग्रामिणचे आमदार धीरज विलासराव देशमुख, माजी आमदार वैजनाथ शिंदे, माजी आमदार त्रिबंक भिसे, माजी सभापती ललीतभाई शहा, आबासाहेब पाटील, दिलीपदादा नाडे यांनी प्रमुख प्रचाराची धुरा सांभाळली.

लातूर शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष ॲड. किरण जाधव, जिल्हा परिषदेचे सदस्य धनंजय देशमुख, विलास बॅकेचे उपाध्यक्ष ॲड.समद पटेल, टवेन्टिवन शुगर्सचे व्हा. चेअरमन विजय देशमुख, विलास कारखाना व्हा. चेअरमन रविद्र काळे, बाजार समिती माजी उपसभापती मनोज पाटील, गोविंद बोराडे, गणेश एसआर देशमुख, गिरीष ब्याळे, रमेश पाटील, राजकुमार पाटील, स्मिता खानापूरे, सपना किसवे हे निरीक्षक व सर्व टीमने  निवडणूकीत अहोरात्र परिश्रम घेतले. सर्व उमेदवार एकतर्फी विजयी झाले असून कृषी उत्पन्न बाजार समितीवर पून्हा झेंडा फडकला आहे.

लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीतकृषी विकास पॅनलचा दणदणीत एकतर्फी विजय

उच्चतम कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणूक – २०२३ चे आज शुक्रवार दि. २८ एप्रिल रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ पर्यंत १८ जागांसाठी मतदान यशवंत प्राथमिक विदयालय, ग्यानबा मोरे प्राथमिक शाळा, जिजामाता कन्या प्रशाला या ठिकाणी झाले. यामध्ये ग्रामपंचायत मतदार संघात १०६८ मतदारा पैकी १०६० मतदारांनी, सोसायटी मतदार संघात १०३५ मतदारा पैकी १०१९, व्यापारी मतदार संघात २०५५ मतदारांपैकी १७७४ मतदारांनी तर हमाल मापाडी मतदार संघात १८२५ मतदारांपैकी १५८१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. एकुण मतांची सरासरी टक्केवारी पाहता ९०.३७ टक्के एवढे मतदान झाले.

कृषी विकास पॅनल माध्यमातून ही निवडणुक लढवीत असतांना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक काळीजीपूर्वक घेतली. याकरीता उमेदवार निवडीपासूनच चांगले नियोजन केले. विविध संस्थाचे पदाधिकारी, स्थानीक पातळीवर कार्य करणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली. आमदार धीरज देशमुख यांनी कल्पक योजनांची माहिती देऊन अदययावत पध्दतीने प्रचार यंत्रणा राबवली.

प्रभावी व नियोजनबध्द प्रचार
कृषी विकास पॅनलची निवड झाल्यानंतर गाव पातळीवरील ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक या सर्व पदाधिकाऱ्यांना माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी एकत्र करून प्रचारास सुरुवात केली. प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी गावभेट, मतदार भेट, पदाधिकारी व मतदार मेळावा आयोजित करून प्रभावी प्रचार यंत्रणा राबवली. लातूर बाजार समितीसह जिल्हा परिषद सर्कल मधील इतर सर्व शेतकरी, व्यापारी, हमाल, मापाडी (तोलारी), महिला कामगार, मतदार बंधू-भगिनीची प्रत्यक्ष भेट घेऊन कृषी विकास पॅनल लातूरच्या उमेदवाराकडून संवाद साधला गेला. विशेष म्हणजे सहकारीतील सर्व संस्थाचे पदाधिकारी प्रचारात पूर्णपणे सक्रीय राहिले याचा फायदा कृषि विकास पॅनलला मिळाला आहे.

जाहीरनामा व वचनपूर्ती
लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक सुरू झाल्यापासून विरोधकांचे पॅनल करणे, उमेदवार निवडणे यात मोठ्या प्रमाणात गोंधळ होता. माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी मात्र केलेल्या कामाची वचनपूर्ती व भविष्यात करावयाच्या कामाचा जाहीरनामा मांडला. प्रचारात विरोधकांवर टीका न करता आपण केलेले काम त्यांनी मतदारापर्यंत पोहोचवले त्यामुळे मतदारांचा त्यांना कौल मिळाला आहे.

शेतकऱ्यांसाठीच्या योजनांना मतदारांचा प्रतिसाद

कृषि उत्पन्न बाजार समिती ज्याच्या जीवावर चालते त्या शेतकऱ्यासाठी व शेती विकासासाठी अनेक योजना राबवण्याचे आश्वासनही कृषि विकास पॅनलच्या वतीने या जाहीरनाम्यात देण्यात आले होते. यामध्ये कृषि परिषद, शेतकरी मेळावे, शिवारफेरी आयोजन करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन, पारंपरिक बियाण्याच्या बॅंकेची ऊभारणी, अदययावत कृषि अवजारांची उपलब्धता, सेंद्रींय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन, सेंद्रींय भाजीपाला विक्रीसाठी प्रायोगिक तत्त्वावर डायल फॉर भाजीपाला योजना, कृषि क्षेत्रातील माहिती व घडामोडी कळण्यासाठी कृषि ग्रंथालय, कृषिमाल साठवणुकीसाठी कार्यक्षेत्रात विभागनिहाय गोडाऊन, शेतीमाल वर्गीकरण, स्वच्छता व  पॅकेजिंग युनीट, ई मार्केट कृषि माल विपणन सेवा, निर्यात मार्गदर्शन व सुविधा केंद्र, शेतकरी, गुमास्ते, हमाल, माफाडी यांच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी अर्थसहाय्य व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्या संबंधी आश्वासन या जाहीरनाम्यात दिले. या सर्वांना चांगला प्रतिसाद मतदारांकडून मिळाला आणि यामुळे कृषिविकास पॅनलला विजय पताका फडकवण्यात यश मिळाले.

About The Author