उदगीर बाजार समिती आघाडीच्या ताब्यात; आ. बनसोडे यांच्या नियोजनाला यश

उदगीर बाजार समिती आघाडीच्या ताब्यात; आ. बनसोडे यांच्या नियोजनाला यश

उदगीर (एल. पी. उगीले) : मराठवाड्यातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी बाजारपेठ म्हणून नावलौकिक असलेल्या उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका अत्यंत चुरशीच्या वातावरणात संपन्न झाल्या. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे एक पॅनल आणि भारतीय जनता पक्ष शिवसेनेचे दुसरे पॅनल, अशा सरळ लढतीमध्ये आघाडीने आ. संजय बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली उदगीरची जागा राखली आहे. आघाडीला 17 तर भारतीय जनता पक्षाला एक जागा मिळाली आहे. गंमत म्हणजे सोसायटी मतदारसंघ सर्वसाधारण गटातून भारतीय जनता पक्षाचे पॅनल प्रमुख भगवानराव रामचंद्र पाटील तळेगावकर यांना सर्वाधिक मते प्राप्त झाली आहेत. तर काँग्रेसचे इतर सहा जण त्यांच्यानंतर क्रमांकावर येतात.

उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चुरशीच्या झालेल्या निवडणुकात 3435 मतदारांपैकी 3105 मतदारांनी आपला हक्क बजावला होता. अर्थात 90.39% मतदान झाले. यामध्ये विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अकरा जागा साठी 24 उमेदवार रिंगणात होते, आणि 800 मतदारांपैकी 792 मतदारांनी मतदान केले. म्हणजेच 99% मतदान झाले. ग्रामपंचायत गटातून चार जागांसाठी दहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते, या उमेदवारांसाठी 805 मतदारांपैकी 799 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला म्हणजेच 99.5% मतदान झाले. व्यापारी मतदारसंघातील दोन जागांसाठी चार उमेदवार मैदानात होते. या मतदारसंघातील 1261 मतदारांपैकी 970 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, म्हणजेच 76.92% मतदान झाले. हमाल मापाडी मतदारसंघात एका जागेसाठी तीन उमेदवार निवडणूक लढवत होते 569 मतदारापैकी 544 मतदारांनी आपला हक्क बजावला, म्हणजेच 95.60% मतदान झाले.

विजयी उमेदवारांमध्ये भगवानराव पाटील तळेगावकर (437), विजय नीटुरे (419), कल्याण पाटील (414), शिवाजीराव हुडे (397), श्याम डावळे (394), प्रमोद पाटील (374), जीवन पाटील (383) हे आहेत तर या मतदारसंघातून आघाडीचे केवळ 16 मताने पराभूत झालेले उमेदवार दत्ता बामणे (358) हे असून त्यांचा हा निसटता पराभव चटका लावणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या इतर पराभूत झालेल्या उमेदवारांची मते अशी झुंजार पाटील (318), सुधाकर बिरादार (314), रमेश भंडे(310), नवाडे गणपत (301), गंगनबीडे गणपत (300), बिरादार माधव (286) हे आहेत. सोसायटी मतदार संघ महिला गटातून लोकनेते चंद्रशेखर भोसले यांची सुकन्या प्रीती चंद्रशेखर भोसले (474) या सर्वाधिक मते घेऊन विजयी परंपरा कायम ठेवत वर्चस्व ठेवून आहेत, तर याच गटातून सूर्यशिला मोरे (379)याही विजयी झाल्या आहेत. भाजपाच्या जाधव चंद्रकला(336) आणि बोने कलावती (330) या पराभूत झाल्या आहेत.

इतर मागास प्रवर्गातून विधिज्ञ उगीले पद्माकर (400) हे विजयी झाले आहेत. तर त्यांचे प्रतिस्पर्धी शेळके हनुमंत (372) हे पराभूत झाले आहेत. विमुक्त जाती जमाती गटातून बालाजी देवकते (410) हे विजय झाले आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी परकड बालाजी (363) हे पराभूत झाले आहेत. व्यापारी मतदारसंघातून आघाडीचे बाहेती जगदीश(489) आणि कोरे रवींद्र (592) हे विजयी झाले आहेत. त्यांनी आपले प्रतिस्पर्धी बिरादार रमेश (452) आणि पाटील जनार्धन (345) यांचा पराभव केला आहे. हमाल तोलारी मतदारसंघातून आघाडीचे गौतम पिंपरे(366) हे विजय झाले आहेत त्यांनी आपले प्रतिस्पर्धी सुरवसे धनाजी (145) यांचा दणदणीत पराभव केला आहे. . ग्रामपंचायत सर्वसाधारण गटातून पाटील ज्ञानेश्वर (407) आणि संतोष बिरादार (348) हे विजयी झाले आहेत. त्यांच्या जवळचे प्रतिस्पर्धी चिखले मोतीराम (336) आणि निडवंचे दिलीप (304) हे पराभूत झाले आहेत.

ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती गटातून मधुकर एकुर्केकर(385) हे विजयी झाले आहेत त्यांनी आपले प्रतिस्पर्धी आंबेगावे बाबुराव (355) यांचा पराभव केला आहे. तर आर्थिक दुर्बल घटकातून पाटील वसंतराव (435) हे विजयी झाले आहेत. त्यांनी आपले प्रतिस्पर्धी बिरादार बालाजी (322) यांचा पराभव केला आहे.

मिनी विधानसभा म्हणून या निवडणुकाकडे पाहिले जात होते. त्यामुळेच सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आपली पत आणि प्रतिष्ठा पणाला लावली होती. भारतीय जनता पक्षातून अचानक शेवटच्या टप्प्यात शिवाजीराव हुडे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून आघाडीच्या पॅनलचे नेतृत्व मान्य केल्यामुळे, भारतीय जनता पक्षासमोर पेच निर्माण झाला असतानाही, भगवानराव पाटील तळेगावकर यांनी समर्थपणे लढत देऊन विक्रमी मते घेऊन आपले अस्तित्व दाखवून दिले आहे. ही बाजार समिती आघाडीच्या ताब्यात राहावी. यासाठी उदगीरचे आ. संजय बनसोडे हे कायम ठाण मांडून बसून होते. तसेच सतत मतदाराशी संपर्क करून प्रबोधन करत होते. आघाडीने ही जागा राखल्याबद्दल उदगीर शहरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

मनाला चटका लावणारा पराभव….

निवडणूक म्हटले की हार आणि जीत हे ठरलेलेच असते, असे असले तरीही, या निवडणुकीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे संपूर्ण पॅनल विजयी झाले पाहिजे. यासाठी अहोरात्र मेहनत घेऊन जनसंपर्क ठेवणारे वाढवण्याचे नेते दत्ता बामणे यांचा केवळ 16 मताने झालेला पराभव मनाला चटका लावणारा आहे. तसेच ग्रामपंचायत मध्ये चिखले मोतीराम यांचा 12 मतांनी झालेला पराभव ही अनेकांना चटका लावणारा ठरला आहे.

हा विजय लोकनेत्याच्या आठवणींना समर्पित……
उदगीर विधानसभा मतदारसंघांमध्ये विकासाचा बॅकलॉग भरून काढणारे लोकनेते स्वर्गीय चंद्रशेखरजी भोसले यांनी उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विकासाचा पाया रोवला, त्याच बाजार समितीमध्ये विक्रमी मताधिक्याने आपल्याला विजय मिळाला. हा आनंदोत्सव साजरा करत असताना लोकनेते चंद्रशेखर भोसले यांची सतत आठवण येत असून हा विजय त्यांना समर्पित करत असल्याचे विचार लोकनेते चंद्रशेखर भोसले यांची सुकन्या प्रीती चंद्रशेखर भोसले यांनी व्यक्त केले.

अन्यायाविरुद्ध पेटून उठणार…..
कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांच्या हिताची संस्था आहे. या संस्थेमध्ये शेतकऱ्यांची हितच व्हायला हवे. या ठिकाणी जर शेतकऱ्यावर अन्याय होत असेल तर तो आपण कदापि सहन करणार नाही. मतदारांनी माझ्या पॅनलला म्हणावे तसे यश दिले नसले तरी सर्वाधिक मतदान मला करून माझ्यावर विश्वास दाखवला आहे. मी शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही. असे विचार भगवानराव पाटील तळेगावकर यांनी व्यक्त केले.

About The Author