सेवानिवृत्ती बद्दल निर्मलाताई पाटील यांचे सत्कार

सेवानिवृत्ती बद्दल निर्मलाताई पाटील यांचे सत्कार

देवणी (प्रतिनिधी) : देवणी शहरातील जिल्हा परिषद प्रशालेतील पदवीधर शिक्षिका श्रीमती निर्मलाताई कल्याणराव पाटील – जिवणे यांचे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्ती बद्दल प्रशालेच्या वतीने यथोचित सत्कार करून त्यांना निरोप देण्यात आला.या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवणी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा डॉ. कीर्तीताई संजय घोरपडे या होत्या, तर प्रमुख पाहुणे उपनगराध्यक्ष अमित मानकरी, पोलीस निरीक्षक गणेश सोंडारे, नगरसेवक नागेश जीवणे ,जमीर तांबोळी, पोलीस उपनिरीक्षक मुजाहिदीन शेख, गटशिक्षणाधिकारी व्यंकटरावजी बोईनवाड, भाजपाचे युवा नेते अमर पाटील, सेवानिवृत्त आदर्श शिक्षक सुभाष बिराजदार, शालेय समितीचे अध्यक्ष सलीमभाई मणियार, प्रा. रेवण मळभगे, पूजा लिंगराज बिराजदार,सहशिक्षिका शांता लोहारे, गुंडाप्पा जीवणे, सेवानिवृत्त प्रा. बाबुराव जिवणे, मुजीब शेख आदी उपस्थित होते. जिल्हा परिषद प्रशाला देवणीच्या वतीने निर्मलाताई कल्याणराव पाटील- जिवणे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास केंद्रप्रमुख, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, पालक , नागरिक,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जि.प. प्रशालेचे मुख्याध्यापक जी.बी. सूर्यवंशी यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार ए.एम. चौधरी यांनी केले.

हे कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सहशिक्षक एस. एन. बुरले, व्ही.टी .तायडे, आर.बी. मेहत्रे ,आर. जी .जळकोटे ,एस. .व्ही.चिद्रेवार ,बी .डी. मगर, एस. आर. स्वामी, एन .डब्ल्यू. सय्यदा, एम. एस. सुरवसे, जी.पी.पाटील, जी. एस. जाधव, जी.एस. परीट आदीसह विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

About The Author