कु.तरंगिणी स्वामी यांना राज्यस्तरीय गीतगायन स्पर्धेचे तिसरे पारितोषिक
उदगीर (एल.पी.उगीले) : उदयगिरी सांस्कृतिक व क्रीडा मंडळाच्या वतीने महात्मा बसवेश्वर, महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय खुल्या बसव भीम व महापुरुषांच्या जीवनावर आधारित गीतगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत हावगीस्वामी महाविद्यालयातील बी.कॉम. प्रथम वर्षातील विद्यार्थिनी कु.तरंगिणी देवेंद्र स्वामी या विद्यार्थिनींने तिसरे पारितोषिक प्राप्त केले. रोख रक्कम ७१३२ रुपये, इतर १००० रु., भारतीय संविधानातील प्रास्ताविका व स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते. या स्पर्धेच्या ऑडिशनसाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून ऑफलाइन व ऑनलाईन स्वरूपात १०० स्पर्धक आले होते. त्यातून १८ स्पर्धकांची स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.कु.तरंगिणी स्वामिने हे शरण बंधू जणो हे बसव ध्वजगीत उत्कृष्टपणे सादर केले होते.
राज्यस्तरीय खुल्या गीतगायन स्पर्धेत तिसरे पारितोषिक प्राप्त केल्याबद्दल भारत लिबरल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲड.गुणवंतराव पाटील हैबतपूरकर, सचिव उमेश पाटील देवणीकर, उपाध्यक्ष शिवकुमार हसरगुंडे, संगमेश्वर जिरगे,सहसचिव प्रभूराज कप्पीकेरे, कोषाध्यक्ष शंकरप्पा हरकरे, संस्थेचे सर्व सदस्य, महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.एन.जी.एमेकर ,उपप्राचार्य डॉ.आप्पाराव काळगापुरे, संगीत विभागाचे प्रमुख डॉ.कृष्णा अनवले, डॉ.म.ई.तंगावार, प्रा.शिवकुमार उस्तुर्गे, महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.