महात्मा बसेश्वर जयंती उत्सवाच्या निमित्ताने भव्य शोभायात्रा
अहमदपूर शहर महात्मा बसेश्वर शोभायात्रेने दुमदुमले
अहमदपूर ( गोविंद काळे) जगत् ज्योती, विश्वगुरू, समतानायक, महात्मा बसवेश्वर यांची 893 वी जयंतीच्या निमित्ताने अहमदपूर शहरात महात्मा बसवेश्वरांच्या शोभा यात्रेने संपूर्ण शहर बसवन्नाच्या जयघोषाने दुमदुमून गेले.
दि. एक मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने व जगत् ज्योती महात्मा बसवेश्वर चौकात प्रतिमा पूजन करून भव्य, दिव्य शोभायात्रेस शहराच्या मुख्य रस्त्यावरून आरंभ करण्यात आला.
या भव्य शोभा यात्रेत घोड्यावर स्वार क्रांतिकारी महात्मा बसवेश्वर महाराज, दुसऱ्या सजवलेल्या ट्रॅक्टरमध्ये महात्मा बसवेश्वरांचा अश्वारूढ पुतळा, मन्मथ माऊलीचा देखावा आणि शेवटच्या ट्रॅक्टर मध्ये वीरमठ संस्थांचे मठाधिपदी प.पू. राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज, भक्ती स्थळाचे प्रमुख प.पू. आचार्य गुरुराज स्वामी आणि शोभा यात्रेच्या समोरच्या भागांमध्ये परळीचा भव्य, दिव्य बँड पथक, झांज पथक आणि हलकी पथक त्यानंतर साडी ड्रेस कोड मध्ये लिंगेश्वर महिला पाऊल मंडळ, महिला पाऊल मंडळ, पुरुष भजनी मंडळ, यांच्यासह वीरभद्र गुगल कलापथकांचा रोमंचकारी नृत्याने बसव प्रेमी नागरिकांची मने जिंकली.
सदरची शोभायात्रा छत्रपती शिवाजी चौक- आझाद हिंद चौक- क्रांती चौक -महादेव मंदिरातून वीरशैव लिंगायत भवन मध्ये समारोप करण्यात आला. या व्याख्यानात बसवेश्वरांचे अभ्यासक, अभियंता किरण कोरे यांचे महात्मा बसवेश्वर यांचे जीवन आणि कार्य या विषयावर प्रकाश टाकला. व्याख्यानाचा अध्यक्षीय समारोप प.पू.राजसेकर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या प्रवचनाने करण्यात आला. या शोभा यात्रेत माजी मंत्री बाळासाहेब जाधव, आमदार बाबासाहेब पाटील, सांब महाजन, शिवानंद हेगणे, दिलीपराव देशमुख, राजकुमार मजगे ,चंद्रकांत मध्ये, माधव जाधव ,ओम पुणे, डॉक्टर ऋषिकेश पाटील, रामभाऊ बेल्हाळे, डॉक्टर निलेश मजगे, प्राचार्य व्ही व्ही गंपले, गोविंद गिरी,प्रा. विशंभर स्वामी, विलास शेटे , शंकराप्पा भालके, नगरसेवक लक्ष्मीकांत कासनाळे, ॉ. सिद्धार्थकुमार सूर्यवंशी, सतीश नवटके, विठ्ठलराव गुडमे, शरण चौंडा,शिवकुमार उटगे, उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी, आयपीएस अधिकारी अनिकेत कदम ,जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष अभय मिरकले उपाध्यक्ष संदीप चौधरी स्वागत अध्यक्ष राजकुमार पुणे एडवोकेट निखिल कासनाळे सचिव रविशंकर महाजन, कलावती भातंबरे ,आशा रोडगे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राम तत्तापूरे यांनी सूत्रसंचालन संचलन एडवोकेट किशोर कोरे यांनी तर आभार प्रा. धीरज शेटकर यांनी मांंले. या भव्य, दिव्य शोभा यात्रेत जांब, धानोरा, तीर्थ, किनी, सावरगाव थोट, हडोळती, चोबळी, चापोली ,सताळा, किनगाव आणि पंचक्रोशीतील भजनी मंडळासह भाविक भक्तांनी आणि विशेषता महिला भगिनींनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती.
सोहळा यशस्वी करण्यासाठी अभिजीत पुणे, कपिल बिराजदार, रामेश्वर आबंदे, बालाजी काडवादे, गणेश शेटकार, दास महाजन आणि जयंती महोत्सवाच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. या शोभा यात्रेत पोलीस निरीक्षक शैलेश बंकवाड आणि त्यांच्या टीमने सुरक्षा व्यवस्था अत्यंत चोख राखली होती.