संत ज्ञानेश्वर विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा
अहमदपूर ( गोविंद काळे ) : येथील संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त विद्यालयात मोठ्या उत्साहात ध्वजारोहण व बक्षीस वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष गणेश दादा हाके पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून संगीता ताई खंडागळे, पी.एस.आय प्रदीप रेड्डी, संघमित्रा तिगोटे,सतीश गोरगे, मनोहर मुंडे विद्यालयाचे मुख्याध्यापिका आशा रोडगे मुख्याध्यापक उद्धव शृंगारे सह पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी प्रथमतः अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांचे हस्ते महात्मा गांधी व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. व ध्वजारोहण होऊन सामूहिक राज्य गीत म्हणण्यात आले त्यानंतर मान्यवरांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी संघमित्रा तिगोटे यांनी कै.डॉ. राहुल तिगोटे यांच्या स्मरणार्थ काढलेल्या रोजनिशीचे प्रकाशन करण्यात आले. अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते स्पर्धा परीक्षेतील ‘किंग ऑफ वर्ड्स’ या नवोपक्रमातील विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. 95 टक्के पेक्षा अधिक गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी अध्यक्षांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 90% पेक्षा अधिक गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले .महाराष्ट्र दिनानिमित्त अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांचे मनोगत पर भाषणे झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आशा रोडगे यांनी केले सूत्रसंचालन सतीश साबणे यांनी केले तर आभार मुख्याध्यापक उध्दव शृंगारे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.