जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्य राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचे निकाल जाहीर
अहमदपूर ( गोविंद काळे ) 31 मे जागतिक तंबाखू विरोधी दिवसानिमित्त ब्रह्माकुमारीज,
सदभावना भवन उदगीर व सृजन बहुउद्देशीय सेवाभावी संस्थाने नशामुक्त भारत अभियान महाराष्ट्र झोन मध्ये राज्यस्तरीय ऑनलाईन पद्धतीने तंबाखू विरोधी दिनानिमित्य चित्रकला /पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्या स्पर्धेचे आँनलाईन निकाल राजयोगिनी ब्र.कु. महानंदा दिदी यांच्या हस्ते घोषित करण्यात आला.
नशा मुक्त भारत अभियान (NMBA) हा सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाचा (भारत सरकार) एक प्रमुख कार्यक्रम आहे जो देशातील औषधांच्या गैरवापराची मागणी कमी करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. नशा मुक्त भारत अभियान (NMBA), उच्च शिक्षण संस्था, विद्यापीठ कॅम्पस, शाळा आणि सामुदायिक सहभागावर विशेष लक्ष केंद्रित करून, भारतातील तरुणांमध्ये मादक पदार्थांच्या गैरवापराबद्दल जागरूकता वाढवणे हे उद्दिष्ट आहे. व्यसनमुक्तीबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि समाजातील एका व्यापक वर्गापर्यंत पोहोचण्यासाठी ब्रह्माकुमारी संस्थेच्या देशव्यापी नेटवर्कची ताकद ओळखण्यासाठी, ब्रह्माकुमारींची वैद्यकीय शाखा आणि सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय (MSJ&E) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे .
तंबाखूचे दूष्परिणाम या जनजागृतीपर पोस्टर स्पर्धेस अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी संस्थेतर्फे आवाहन केले होते.तंबाखूचे दुष्परिणाम ह्या विषयावर चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून या राष्ट्रीय कार्यात सहभाग घेतला.लहान मुलांचे हे जनजागृतीपर बोलके चित्र खूपच कौतुकास्पद आहेत असे मत कला शिक्षक महादेव खळुरे यांनी व्यक्त केले.
सदरील स्पर्धा निशुल्क होती.या स्पर्धेतील सहभागी प्रत्येक स्पर्धकाला ई- सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
सदरील स्पर्धा दोन गटात होती.
लहान गटातून प्रथम- कु.ईशा अनिल काळे,द्वितीय -खुशीभिमराव आडे,तृतीय- वैष्णवी देविदास वाघमारे तर मोठ्या गटातून प्रथम-कु.प्रियंका काशिराम कवळकर द्वितीय- कु.रुद्राणी विजयकुमार कारभारी द्वितीय-रोशनी वसंता खंडारे,तृतीय-भुमिका निरंजन ठवकर उत्तेजनार्थ वैष्णवी महेश शिनगारे या विद्यार्थ्यांने क्रमांक पटकावला आहे.
मराठवाडा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विद्यार्थ्यांना आँनलाईन व्यासपीठ निर्माण करुन देण्यात आले होते.सर्व सहभागी विद्यार्थ्यांना ई-प्रमाणपत्र व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान गुणवत्ता प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
वरील स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ब्रह्माकुमारी छाया दिदी,बी के मीरा दीदी,
बी के किरण,बी के केदार,जितेंद्र कोव्हाळे,सलिम आतार,बस्वेश्वर थोटे,अविनाश धडे,पद्मा कळसकर,मल्लिकार्जून खळुरे आदिचे सहकार्य लाभले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे लातूर चे जिल्हाधिकारी बी.पी. पृथ्वीराज, मुख्यकार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, शिक्षण उपसंचालक गणपतराव मोरे,विभागीय शिक्षण मंडळाचे सचिव सुधाकर तेलंग,माध्यमिक शिक्षणाधिकारी एन.एस.मापारी,उप शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे,प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे,अहमदपूर चे गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे,सलाम मुबंई फाऊंडेशन लातूर जिल्ह्याचे समन्वयक समन्वयक शुभांगी लाड आदिनी अभिनंदन व कौतुक केले.