महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात गुणवंतांचा रोपटे देऊन सत्कार

महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात गुणवंतांचा रोपटे देऊन सत्कार

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्ष डॉ.रेखा रेड्डी होत्या. मंचावर उपाध्यक्ष ॲड. प्रकाश तोंडारे, सहसचिव डॉ.रामप्रसाद लखोटिया, सदस्य प्रा.मनोहर पटवारी, प्रभारी प्राचार्य डॉ.आर.के.मस्के, उपप्राचार्य डॉ.एस.जी.पाटील, उपप्राचार्य सी.एम.भद्रे यांची उपस्थिती होती. यावेळी वैष्णवी कुंडगीर, प्रतीक गायकवाड, शुभम राठोड, वैष्णवी पवार, भागेश कारागीर, कृष्णा नवटक्के, सुमित तांदळे, अश्विनी भांजी, समृद्धी पेन्सलवार यांचा पालकांसह मान्यवरांच्या हस्ते पुस्तक, रोपटे देऊन सत्कार करण्यात आला. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून रोपटे देऊन गौरव करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी बारावीनंतर विज्ञान शाखेतील करिअर या विषयी प्रा.शैलेश बिरादार यांनी माहिती सांगितली. पालकांनी विद्यार्थ्यांचा प्रगतीचा आढावा दररोज घ्यावा, विद्यार्थ्यांनी गुणासह माणुसकी जतन केली पाहिजे, सर्वांगाने विकसित होऊन अभिव्यक्ती समर्थ केली पाहिजे, स्पर्धेच्या जगामध्ये अशक्य काही नाही. करिअरमध्ये सर्व क्षेत्रात वाव आहे, अशा भावना यावेळी मान्यवरांनी व्यक्त केल्या. पालकांच्या वतीने ॲड.बाळासाहेब नवटक्के, प्रा. डॉ.वसंत पवार, दिपाली पेन्सलवार यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोपात डॉ.रेड्डी म्हणाल्या की, करिअर समुपदेशन करण्यात यावे, सामूहिक प्रयत्नामुळे महाविद्यालयाचा निकाल चांगला लागला आहे. प्रास्ताविक प्रभारी प्राचार्य डॉ.आर.के.मस्के यांनी केले. बारावी निकाला विषयी माहिती प्रा.सी.एम.भद्रे यांनी दिली. सूत्रसंचालन प्रा.जे.आर.कांदे यांनी केले, तर आभार प्रा.प्रवीण जाहुरे यांनी मानले.

About The Author