ग्राफिक्स डिझाईनचे काम करुन मिळवले यश, श्रेयाला आयएएस व्हायचे आहे

ग्राफिक्स डिझाईनचे काम करुन मिळवले यश, श्रेयाला आयएएस व्हायचे आहे

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : कुटुंबाची आर्थिक परिस्थिती आणि गरीबीची जाणीव असल्यांने मामाकडे राहून आणि ग्राफिक्स डिझाईनचे काम करुन इयत्ता दहावी परीक्षेच्या निकालात न्यू इंग्लिश स्कूलची श्रेया ज्ञानेश्वर पवार या विद्यार्थिनीने ८७.२० टक्के गुण प्राप्त करुन उत्तीर्ण होण्यांचा बहुमान श्रेया पवार हिने पटकावला आहे. मुळगाव नायगांव असलेल्या श्रेया ज्ञानेश्वर पवार हिने लहानपणापासून आई संगीता पवार यांच्यासोबत अकोला जिल्ह्यांतील कौलखेड गोमासे येथील मामा भावसिंग सोळुंके यांच्याकडे राहत होती. इयत्ता पहिलीपासून श्रेया ही अकोला शहरांतील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण घेत होती. श्रेया पवार अपडाऊन करीत शिक्षण घेत होती. नियमित अभ्यास करुन इयत्ता दहावी परीक्षेच्या निकालात तिने ८७.२० टक्के गुण प्राप्त करून न्यू इंग्लिश स्कूल मधून मुलींमधून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा बहुमान मिळवला आहे. मामा भावसिंग सोळुंके शेतकरी कुटुंबाची आर्थिंक परिस्थितीत बेताची असून अशा परिस्थितीत मामाच्या घरी शिक्षण घेणारी श्रेया पवार गेल्या दोन वर्षापासून ग्राफिक्स डिझाईनचे काम करीत आहे. त्यातून मिळणाऱ्या कमाईतून स्वतःच्या शिक्षणाचा आणि घर खर्च भागविण्यांचे काम ती करीत होती.
या यशाबद्दल श्रेया पवार पुढे म्हणाली, विज्ञान शाखेत पदवीव्युतर शिक्षण घ्यायचे आहे. पदवीव्यूतर शिक्षण पूर्ण केल्यानंतर युपीएसीची परीक्षा उत्तीर्ण करुन आयएएस अधिकारी होण्यांचे स्वप्न तिने पाहिले आहे. तिच्या यशाबद्दल अकोला जिल्ह्यातूनच नव्हे तर ग्राफिक्स डिझाईनच्या माध्यमांतून सर्वांशी परिचय झालेल्या तमाम जनतेकडूंन तिचे विशेष कौतुक होत आहे. तिच्या यशाबद्दल अभिनंदनचा वर्षाव होत आहे. श्रेया पवार यांच्या यशाबद्दल सातारा जिल्ह्याचे आणि सर्व जिल्ह्यातील प्रशासनांच्या परिचयांतील असणारे संभाजी पुरी गोसावी यांनी अभिनंदन करून, कौतुक केले.

About The Author