दयानंद आर्ट गॅलरीचे उद्घाटन पृथ्वीराज बी पी यांच्या हस्ते संपन्न

दयानंद आर्ट गॅलरीचे उद्घाटन पृथ्वीराज बी पी यांच्या हस्ते संपन्न

लातूर (प्रतिनिधी) : दयानंद शिक्षण संस्था संचलित दयानंद कला महाविद्यालय लातूर येथे दयानंद आर्ट गॅलरीचे उद्घाटन मा.जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, उपाध्यक्ष रमेशकुमार राठी, सचिव रमेश बियाणी, संयुक्त सचिव सुरेश जैन , कोषाध्यक्ष संजय बोरा, नियामक मंडळ सदस्य विशाल लाहोटी, विशाल अग्रवाल, ॲड.माधव इंगळे, दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जप्रकाश दरगड, दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, उपप्राचार्य अनिलकुमार माळी, पर्यवेक्षक डॉ. दिलीप नागरगोजे, फॅशन विभाग प्रमुख प्रा. सुवर्णा लवंद, प्रशासकीय अधीक्षक श्री. रुपचंद कुरे आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

याप्रसंगी प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड यांनी प्रास्ताविक करताना असे प्रतिपादन केले की, दयानंद कला महाविद्यालय अंतर्गत फॅशन ड्रेस डिझाईन, ॲनिमेशन , संगीत विभाग यांच्या वतीने विद्यार्थ्यांमधील सुप्त कला गुणांना मुक्त व्यासपीठ मिळावे तसेच त्यांना अर्थार्जन करता यावे हा उदात्त दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून दयानंद कला महाविद्यालयाने आर्ट गॅलरीची सुरुवात 2019 पासून केली आहे. या विभागाअंतर्गत हस्तकला, सजावटीचे साहित्य, सौंदर्य प्रसादने, गृह उपयोगी साहित्याची निर्मिती विद्यार्थ्यांच्या माध्यमातून केली जाते. त्या कलाकृतीचे प्रदर्शन व विक्री केली जात आहे. कौशल्यावर आधारीत विविध अभ्यासक्रमाच्या माध्यमातून या उपक्रमाची सुरुवात झाली असल्याचे प्रतिपादन केले. यातून उदन्मुख कलावंतांना संधी मिळून त्यांना अर्थाजन प्राप्त करण्याची संधी मिळत आहे.

जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी यांनी आर्ट गॅलरीच्या उद्घाटन प्रसंगी असे प्रतिपादन केले की, दयानंद शिक्षण संस्था ही शैक्षणिक क्षेत्रासह सामाजिक उपक्रमात उल्लेखनिय कार्य करणारी संस्था असून विद्यार्थ्यांना कौशल्याभिमुख व रोजगाराभिमुख उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणारी एक आदर्श संस्था आहे. विद्यार्थ्यांना Startup India योजने अंतर्गत विद्यार्थ्यांना कौशल्याभिमुख व रोजगाराभिमुख उपक्रम शैक्षणिक संकुलात दयानंद कला महाविद्यालय राबवत आहे. ही बाब गौरवास्पद आहे. तसेच त्यांच्या या कार्याची प्रेरणा इतर संस्था व महाविद्यालयांनी घ्यावा असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. प्रतीक्षा पाटवकर हीने केले तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक डॉ. दिलीप नागरगोजे यांनी मांडले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी फॅशन विभागातील सर्व प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.

About The Author