आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत डॉ. शरद तेलगाने सह मान्यवरांचा सत्कार संपन्न
उदगीर (एल. पी. उगीले) : आजादी का अमृत महोत्सव आणि केंद्र सरकारमध्ये नरेंद्र मोदी सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाल्या निमित्त, “संपर्क से समर्थन मोदी महाजन संपर्क अभियान” अंतर्गत उदगीर शहरातील विविध क्षेत्रातील प्रथित यश मान्यवरांचा सत्कार भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आला. तसेच समाजसेवेमध्ये अग्रेसर राहून समाजाची सेवा करत असल्याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या वतीने ऋण व्यक्त करून केंद्र सरकार आणि राज्य सरकार बद्दल त्यांच्या एकूण कामगिरीवर चर्चा करून सामाजिक उपक्रमात सतत सहकार्य केल्याबद्दल आभारी व्यक्त करण्यात आले. या अभियानाच्या निमित्ताने उदगीर शहरातील प्रख्यात स्त्री रोग तज्ञ तथा प्रबोधनकार, कीर्तनकार, समाजसेवक डॉ. शरदकुमार तेलगाने, विश्व हिंदू परिषदेचे जुने कार्यकर्ते कपिल कनकदंडे, चंद्रचकोर कारखाने, प्रा. गोविंदराव जामखंडे, एड. अजय दंडवते, लक्ष्मीबाई पांढरे, अड. विश्वनाथ अंकुलगे, ह. भ. प .उद्धव महाराज हैबतपुरे, डॉ. प्रकाश येरमे, प्रशांत मांगुळकर, आशिष अंबरखाने या ज्येष्ठ मान्यवरांचा तसेच ह भ प डॉ. शरदकुमार तेलगाने यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष मनोज पुदाले, माजी नगराध्यक्ष बसवराज बागबंदे, माजी उपाध्यक्ष सुधीर भोसले, भाजपा माजी तालुकाध्यक्ष वसंत शिरसे, माजी नगरसेवक सावन पस्तापुरे, दत्ताजी पाटील, आनंद बुंदे, व्यंकट काकरे, रामेश्वर पवार, साईनाथ चीमेगावे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना डॉ. शरदकुमार तेलगाणे यांनी स्पष्ट केले की, आपण ज्या समाजात राहतो, त्या समाजाचे आपण काही देणे लागतो. ही भावना प्रत्येकाने आपल्या मनामध्ये बिंबवणे गरजेचे आहे. सामाजिक जाणीव सोबतच इतरांना मदत करण्याच्या भावना ठेवायला पाहिजेत. एक दुसऱ्याच्या मदतीनेच राष्ट्राचा आणि आपला सर्वांचा विकास शक्य आहे, असे सांगितले.