ओम साई संस्थेच्या वतीने कॅन्सर ग्रस्त रुग्णांला आर्थिक मदत
उदगीर(प्रतिनिधी): तालुक्यातील तोंडार येथील सर्वसामान्य कुटुंबातील गणेश एकनाथ पटवारी (पांडे) या तरुणांस तोंडाचा कॅन्सर झाला,घरची परिस्थिती बेताची असल्याने उदार उसनवारी करून हळूहळू उपचार चालू होता, हा तरुण साधारणपणे या रोगातुन बरा झाला होता, परंतु प्रत्येक महिन्याला पुणे येथे जाऊन उपचार घेण्यासाठी आर्थिक बाबींची अडचण जाणवु लागल्याने तोंडार येथील ओम साई सेवाभावी संस्थेच्या वतीने पुढील उपचारासाठी पंचवीस हजार रुपये देण्यात आले.
गणेश एकनाथ पटवारी (पांडे) एक अटो चालक, अटो तोंडार, उदगीर असा चालवत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत असे, त्यातच गणेशला अचानक कॅन्सर झाला असल्याचे तपासाअंती निष्पन्न झाले,व एकच धांदल, पैशाची जमवाजमव करत पुणे येथे इंद्रायणी हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल झाला, हालात बेताची त्यातुनच दिवस काढत आपल्या प्रकृतीची काळजी घेत या रोगापासून बचाव करण्यासाठी प्रयत्न केले,व बरा होउन आपल्या स्वगृही आला, मात्र प्रत्येक महिण्यास केमो साठी जाने कठीण होत होते. या गोष्टीची कल्पना येतात सतत सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविलेले ओम साई सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवकुमार पांडे यांनी आपल्या टिम चा माध्यमातून पंचवीस हजार रुपये ची आर्थिक मदत त्यांचा कुटुंबीयांकडे दिली. या वेळी मंडळाचे सदस्य कैलास खिंडे, शिवलिंगप्पा नावंदे, विरभद्र बिरादार, नंदय्या स्वामी, निळकंठ बिरादार, रामेश्वर बिरादार, गोविंद पांडे, संदीप बिरादार, संग्राम भिंगोले सह गावातील प्रतिष्ठित नागरिक मनोहर बिरादार, गंगाधर कंठे उपस्थित होते.