पाच लाखासाठी छळ, मृत्यूस कारण ठरल्याबद्दल गुन्हा दाखल.
उदगीर (एल.पी.उगीले) : माहेरहून पाच लाख रुपये घेऊन ये, पिकप वाहन खरेदी करायचे आहे. असे म्हणून विवाहितेचा छळ केला, तसेच तुला मूल बाळ होत नाही, म्हणून सासरच्या लोकांनी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. या छळाला कंटाळून विवाहितेने उदगीर शहरालगत असलेल्या हैबतपुर येथे आपल्या घरीच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मयत विवाहित महिलेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात पोलीस सूत्राकडून हाती आलेली माहिती अशी की, उदगीर तालुक्यातील हैबतपुर येथील निजाम शेख यांच्यासोबत चाकूर येथील जन्नत तिचा विवाह झाला होता. विवाहानंतर जवळपास एक वर्ष तिला चांगले नांदवले गेले. त्यानंतर मात्र तिला मूल होत नाही, म्हणून सासरच्या मंडळींनी तिचा शारीरिक व मानसिक सुरू केला. त्याचबरोबर पती निजाम याने तू माहेरहून पिकप वाहन खरेदीसाठी पाच लाख रुपये घेऊन ये, म्हणून तिला तगादा लावला. सासरच्या मंडळीकडून होणारा सततचा त्रास सहन न झाल्याने, छळाला कंटाळून विवाहित जन्नत हिने हैबतपुर येथील राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. या संदर्भात मयताची आई मुमताज खुर्शीद शेख (रा. चाकूर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे पती निजाम शेख, सासरे शेख गफार, सासू मुन्नाबी शेख तसेच रहीम शेख, अजीम शेख, जहूर शेख, तसलीम शेख, नसलुम शेख यांच्याविरुद्ध गु. र.न. 363 /23 कलम 304 (ब ),306, 498(अ), 323, 34 भारतीय दंड विधान संहिता अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चेरले हे करत आहेत.