महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातर्फे विनायकराव बेंबडे यांचा सत्कार
उदगीर(प्रतिनिधी): नीती आयोग भारत सरकार व युवक कल्याण क्रीडा मंत्रालय संलग्नित पुणे येथील पद्मश्री डॉ. मनीभाई देसाई प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा डॉ. मनीभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार ग्राम विकास बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ इसमालपूरचे सचिव विनायकराव बेंबडे यांना प्रदान झाल्याबद्दल, महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या वतीने संस्थेचे सचिव रामचंद्र तिरुके, सदस्य प्रा. मनोहर पटवारी, प्रभारी प्राचार्य डॉ.आर. के .मस्के, पांडुरंग विद्यालयाचे मुख्याध्यापक एस .वि.नादरगे, प्रा. प्रवीण जाहुरे, प्रा. एस.बी.एडले, प्रा.ए.सी. बिरादार , तुकाराम बेंबडे यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते पांडुरंग विद्यालयात शाल, श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. राष्ट्रभक्तीची ज्योत तेवत ठेवण्यासाठी व समर्पित भावनेने निष्काम कर्मयोगी कार्य घडावे, व कार्यकर्त्यांच्या हातून राष्ट्रसेवा घडावी. यासाठी पद्मश्री डॉ. मनीभाई देसाई प्रतिष्ठानच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. विनायकराव बेंबडे यांनी पांडुरंग विद्यालय कल्लूरच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शोषित ,वंचित विद्यार्थ्यांना शिक्षण व वसतिगृहाच्या माध्यमातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होण्यासाठी मौलिक कार्य केले आहे. या त्यांच्या ग्रामीण भागातील कार्याची दखल घेऊन त्यांना हा मानाचा पुरस्कार देण्यात आला आहे.